Join us

करिष्मा तन्ना, समीर कोचरची कोट्यवधींची फसवणूक, पोलिसात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 11:46 IST

करिष्मा तन्नाला कोट्यवधी रुपयांचा गंडा

अभिनेत्री करिष्मा तन्ना (Karishma Tanna), तिचे पती वरुण बांगेरा आणि अभिनेता समीर कोचर (Samir Kochar) फसवणूकीचे शिकार झाले आहेत. मुंबईत फ्लॅट विक्रीप्रकरणी त्यांची फसवणूक झाली आहे. या केसमध्ये त्यांनी दोन जणांविरोधात तक्रारही दाखल केली आहे. रियल इस्टेट डेव्हलपमेंट फर्मच्या मालकाविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

माध्यम रिपोर्ट्सनुसार, प्रोणित प्रेम नाथ आणि पत्नी अमिषा यांनी तक्रारदारांना बांद्रा येथील त्यांच्या कंस्ट्रक्शन साईटवर फ्लॅट विक्री करण्याच्या नावावर १.०३ कोटी रुपयांना फसवल्याचं समोर आलं आहे. हे २०२२ सालचं प्रकरण आहे. तेव्हा आरोपींनी समीरशी संपर्क साधून फ्लॅट विकण्याची तयारी दाखवली. कर्ज फेडायचं असल्याने फ्लॅट विकत असल्याचं कारण आरोपींनी दिलं होतं. 

यानंतर समीरने करिष्मा तन्ना आणि तिच्या पतीला याबाबत सांगितलं. दोघांनी दोन फ्लॅटचं अॅग्रीमेंट केलं. आरोपींनी ठरलेला फ्लॅट न देता वेगळाच फ्लॅट विकला. हे कळताच करिष्मा आणि समीर यांनी तक्रार दाखल केली. अंधेरी पोलिसांनी नाथ आणि पत्नीविरोधात आयपीसी कलम 409,420 अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

टॅग्स :करिश्मा तन्नाधोकेबाजीपैसाटिव्ही कलाकार