Join us

कोयना मित्राला सर्जरी करणं पडलं होतं महागात, म्हणाली - अनेक अडचणींचा केला सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 16:34 IST

Actress Koena Mitra revealed about surgery : कोयनाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडल म्हणून केली होती.

कोयनाच्या जीवनात एक मठं वादळ आलं, ज्यामुळे तिचे करिअर पणाला लागलं. त्या काळात कोयना आपल्या चेहऱ्यावर खुश नव्हती. त्यामुळे आणखी सुंदर दिसण्यासाठी कोयनाने प्लास्टिक सर्जरी केली. तिने नाकाची सर्जरी केली. मात्र या सर्जरीचा उलट परिणाम झाला. सर्जरीमुळे कोयनाचा चेहरा आणखी खराब झाला. कधीकाळी कोयनाकडे अभिनयासह काही आयटम नंबर होते, मात्र सर्जरीनंतर दिग्दर्शकांनी कोयनाकडे पाठ फिरवली. कोयनाला या सर्जरीमुळे काम मिळणं बंद झालं. तिच्यावर घरी बसण्याची वेळ आलीय. चित्रपटसृष्टीपासून ती दूर गेली.

म्हणाली, 'सर्जरीनंतर माझ्या चेहऱ्यावरील हाडे सुजलेली होती. पायाचे तुटलेला हाड बरे होण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागतो आणि यामुळे पायात सूज देखील येते. याला बरं होण्यासाठी सुमारे सहा महिने किंवा एक वर्षाचा कालावधी लागतो.

कोयना म्हणाली, 'माझे प्रकरणातही असेच काहीसे झाले होते. माझ्या गालांवरील हाडांवर याचा परिणाम झाला. इथेही माझ्या गालांची हाडे सुजलेली होती. माझा चेहरा पाण्याने भरून गेला होता. यासह प्रत्येक गोष्ट खूप विचित्र दिसत होती. प्रत्येकाला असे वाटले की काहीतरी चूक झाली आहे. शस्त्रक्रियेबद्दल माझ्या शरीरावरचे रिअॅक्शन चुकीचे होते. शस्त्रक्रिया चुकीची झाली नाही. हे सामान्य होते. 

https://www.facebook.com/koynamitra/photos/a.124911610856669/3645375135476948/

घरातून बाहेर पडणंही तिला कठीण बनलं. सर्जरीमुळे तिचा चेहरा खराब झाला. औषधं आणि प्रार्थनाच काही चमत्कार करेल असंही डॉक्टरांनी कोयनाला सांगितलं. तरी कोयना हिंमत हरली नाही. त्या चेहऱ्यासह ती घराबाहेर पडू लागली. जे घडलं ते मान्य करण्याशिवाय कोयनाकडे पर्याय नव्हता. मात्र लोक तिला स्वीकारण्यास तयार नव्हते. संकटसमयी तिच्या मित्रांनीही तिची साथ सोडली. चेहरा ठीक करण्यासाठी कोयनाने आणखी काही सर्जरीसुद्धा केल्या. मात्र त्यात यश आलं नाही. एका मुलाखती दरम्यान कोयाना  

टॅग्स :कोएना मित्रा