Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही क्षणी अभिनेत्री देऊ शकते बाळाला जन्म, तिसऱ्यांदा होणार आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 10:19 IST

प्रेग्नंसीदरम्यान ग्लॅमरस दिसण्यात तिने करिना कपूर आणि अनुष्काला देखील मागे टाकले आहे.

गेल्या काही महिन्यांत अनेक अभिनेत्रींनी बाळाला जन्म देत मदरहुड एन्जॉय करतायेत. आता लवकरच आणखी एक अभिनेत्री बाळाला जन्म देणार आहे. ती अभिनेत्री आहे दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे लिसा हेडन. लिसा हेडन तिसऱ्यांदा आई होणार आहे. लिसाला दोन मुलं आहेत.  जॅक  आणि लिओ नावाची दोन मुलं आहेत. 

मुलांच्या जन्मानंतर लिसा तिच्या खासगी आयुष्यात रमली.  मुलांची काळजी घेण्यातच ती जास्त व्यस्त झाली. लिसा हेडन सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. खासगी आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसह शेअर करत असते. प्रेग्नंसीची गुड न्यूजही तिने चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर केली होती. चाहत्यांना ही गोड बातमी दिली तेव्हापासून तिची प्रेग्नंसी ती कशी एन्जॉय करतेय याविषयीच्या सगळ्याच अपडेट ती शेअर करत होती.आता लिसाला नववा महिना सुरु असून जून महिन्यांत बाळाला जन्म देणार असल्याचे तिने सांगितले होते. 

सोशल मीडियावर लीसा हेडनच्या फॉलोअर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. प्रेग्नंसीकाळात तिने केलेल्या बोल्ड फोटोशूटचीही प्रचंड चर्चा झाली होती. तिस-यांदा प्रेग्नंट असलेली लिसा पुन्हा एकदा त्याच कारणामुळे सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

प्रेग्नंसीमध्ये 9 व्या महिन्यात बिकीनी फोटोशूट करत तिने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे प्रेग्नंसीदरम्यान तिची ही हटके स्टाईल स्टेटमेंट भलतीच सुपरहिट ठरली आहे. प्रेग्नंसीदरम्यान ग्लॅमरस दिसण्यात तिने करिना कपूर आणि अनुष्काला देखील मागे टाकले आहे.

विशेष म्हणजे तिस-यांदा आई होणारी लिसाने चार मुलं असावीत असं पतीनं यापूर्वीच सांगितल्याचं  नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.लिसा ऑक्टोबर 2016 मध्ये डिनो ललवाणी यांच्यासोबत विवाहबध्द झाली होती. लिसा आणि आता हे दांपत्य तिसऱ्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

टॅग्स :लीसा हेडन