Join us

'अजय देवगण अन् माझं वय...' अभिनेत्री मधुने सांगितलं इंडस्ट्री सोडण्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 11:45 IST

आजही एका वयानंतर अभिनेत्रींना विशिष्ट रोल ऑफर केले जातात.

'रोजा' ब्लॉकबस्टर सिनेमातून सर्वांनाच आपल्या अभिनयाच्या प्रेमात पाडणारी अभिनेत्री मधु (Madhu). ९० च्या दशकात तिचं नाव आघाडीवर होतं. तेव्हा बॉलिवूडही मधुला घेण्यासाठी उत्सुक होतं. मधुने यशाच्या शिखरावर असतानाच बॉलिवूड सोडलं होतं. अनेक वर्षांनी तिने याबाबत खुलासा केला आहे. 

नुकत्याच एका मुलाखतीत मधु म्हणाली, 'ज्या प्रकारच्या भूमिका मला ऑफर होत होत्या त्यात मी खुश नव्हते. आजही एका वयानंतर अभिनेत्रींना विशिष्ट रोल ऑफर केले जातात. मी त्यावेळी एका स्टारच्या आईची भूमिका साकारण्यास अजिबातच तयार नव्हते.'

ती पुढे म्हणाली,'मी आणि अजय देवगणने 1991 साली एकाच सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याच्याच आईची भूमिका साकारण्यात मला काहीही इंटरेस्ट नव्हता. एकाच वयाचे असतानाही मला ही भूमिका ऑफर झाली होती.'

90 च्या दशकात एक्शन फिल्म आणि हिरोंचा बोलबाला होता. या सिनेमांमध्ये माझा रोल केवळ डान्स करणं, काही रोमँटिक डायलॉग आणि आई वडिलांसोबत अश्रू वाहणं एवढाच होता. या सगळ्यात मी केवळ डान्स एन्जॉय केला. हळूहळू मला समजलं की मी या बदलामुळे खुश नाहीए, असंही ती म्हणाली.

या चर्चांदरम्यान इंडस्ट्री सोडण्यामागचं आणखी एक कारण मधूने सांगितलं. ती म्हणाली,'इंडस्ट्रीत जवळपास १० वर्ष काम केल्यानंतर मला समजलं की आता हे सोडायची वेळ आली आहे. मला लग्न करायचं होतं आणि हेच माझ्या इंडस्ट्री सोडण्यामागचं मुख्य कारण होतं. म्हणूनच मी घरसंसारात रमले.'

टॅग्स :मधूअजय देवगणबॉलिवूड