पॅलेस्टाईनमधील हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये मागच्या काही वर्षांत अनेकवेळा संघर्ष झाला आहे. मात्र, यावेळी हमासने शनिवारी ( ७ ऑक्टोबर) रोजी जमीन, पाणी आणि हवेतून अशा तीनही बाजूंनी इस्रायलवर हल्ला केला. हमासने मध्यरात्री केलेल्या हल्ल्यामुळे एक हजारांहून अधिक लोकांना आतापर्यंत जीव गमावला आहे. या युद्धात अभिनेत्री मधुरा नाईकच्या बहिणीची आणि पतीची त्यांच्या मुलांसमोर पॅलेस्टाईन दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली. यासंदर्भात मधुराने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
मधुरा नाईकने सोशल मीडियावर तिची बहीण ओदाया, बहिणीचा नवरा आणि त्यांच्या मुलांचा फोटो शेअर केला आहे. तिने पोस्टमध्ये लिहले की, "माझी बहीण ओदाया आणि तिच्या नवऱ्याची त्यांच्या मुलांसमोर पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली. ओदायाचं प्रेम कायमच माझ्या आठवण राहील". शिवाय, मधुराने इस्रायलमधील सगळ्या पीडितांसाठी पार्थना केली.
मधुराने एक व्हिडीही पोस्ट केला आहे. त्यात ती म्हणते की,"मी मधुरा नायक, भारतात जन्मलेली एक ज्यू आहे. भारतात आम्ही फक्त 3000 आहेत. माझी बहीण ओदाया आणि तिची पतीची त्यांच्या दोन मुलांसमोर इस्रायलमध्ये हत्या करण्यात आली. माझ्या कुटुंबाला या वेळी ज्या वेदना आणि त्रास सहन करावा लागतोय, तो शब्दात मांडता येणार नाही.
"आज इस्रायल दुखात असून हमासच्या आगीत लहान मुले, महिला आणि वृद्ध जळतायं. माझ्यावर प्रेम करणार्यांना मी सांगू इच्छितो की पॅलेस्टाईन समर्थक प्रचारामुळे इस्रायली मारेकरी दिसत आहेत. हे योग्य नाही. स्वतःचा बचाव करणे म्हणजे दहशतवाद नाही आणि मला हे स्पष्ट करायचे आहे की मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही. कृपया या कठीण काळात इस्रायलमधील लोकांच्या पाठिशी उभे रहा. दहशतवाद्यांचा खरा चेहरा आणि ते किती क्रूर असू शकतात, हे लोकांनी पाहण्याची हीच वेळ आहे". तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्यात. काही जणांनी तिला पाठिंबा दिलाय तर काहींनी इस्रायलमधील लोकांच्या बाजूने पोस्ट शेअर केल्याबद्दल तिला ट्रोल केलं.