Join us  

महिमा नाही 'ही' अभिनेत्री होती 'परदेस'साठी पहिली पसंत; सुभाष घईंसोबत खटकलं अन् हातून सिनेमा निसटला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 5:30 PM

'कर्मा', 'राम लखन', 'ताल' यांसारखे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक सुभाष घई यांचा 'परदेस' ही त्याकाळी प्रचंड गाजला.

Subhash Ghai Pardes : ९० च्या दशकात बॉलिवूडमध्येसुभाष घई निर्मित चित्रपटांची चलती होती.  'कर्मा', 'राम लखन', 'ताल' यांसारखे सुपरहिट चित्रपट देणारे   दिग्दर्शक सुभाष घई यांचा 'परदेस' ही त्याकाळी प्रचंड गाजला. या चित्रपटाचं कथानक तसेच त्यातील कलाकारांचा अभिनय शिवाय त्यातील गाणी हे  सगळं प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावरच घेतलं. आज या चित्रपटाला २७ वर्ष पूर्ण होत आहेत. 

'परदेस' या सिनेमातील 'दो दिल मिल रहें है', 'मेरी महबुबा'  आणि 'दिल दिवाना...' या गाण्यांचे बोल आजही चाहत्यांच्या मनाला भिडलेले पाहायला मिळतात. १९९७ साली 'परदेस' चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान, महिमा चौधरी, अमरीश पुरी, आलोक नाथ, हिमानी शिवपुरी यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटाला नदीम-श्रवण यांनी संगीत दिलं होतं. त्याकाळी ८ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. 'परदेस'ने जगभरातून ४०.८२ कोटी इतकी कमाई केली.  

मीडिया रिपोर्टनुसार, या सिनेमासाठी महिमा चौधरी नाहीतर अभिनेत्री माधुरी दीक्षित दिग्दर्शकांची पहिली पसंत होती. पण, 'खलनायक' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान माधुरी आणि सुभाष घई  यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं. ज्यामुळे अभिनेत्रीने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. शिवाय सुभाष घई यांना 'परदेस'मध्ये एक नवा चेहरा प्रेक्षकांच्या समोर आणायचा होता. त्यामुळे ऋतु चौधरी हे नाव बदलून महिमा चौधरीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यात आली. त्यामुळे माधुरी दीक्षितच्या हातून हा सुपरहिट सिनेमा निसटल्याचं सांगण्यात येतं. 

टॅग्स :माधुरी दिक्षितमहिमा चौधरीसुभाष घईबॉलिवूडसेलिब्रिटी