Join us

‘या’ अभिनेत्रीने दिग्दर्शकाविरोधात दाखल केला गुन्हा , म्हणे माझ्या जीवाला धोका!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 12:51 PM

फिल्मी दुनियेत काय होईल याचा नेम नाही. आता एका हिरोईनने तिच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देमंजूने मेनन यांच्या ‘ओडियन’ या चित्रपटात काम केले होते.

फिल्मी दुनियेत काय होईल याचा नेम नाही. आता एका हिरोईनने तिच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. होय, या अभिनेत्रीचे नाव आहे, मंजू वॉरियर. साऊथची लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या मंजूने दिग्दर्शक व्ही ए श्रीकुमार मेनन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. श्रीकुमार मेनन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तिने केला आहे.मेनन यांनी सोशल मीडिया कॅम्पेनद्वारे मला बदनाम करत आहेत. त्याच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या मित्रांनाही ते धमकावत आहेत, असे मंजूने म्हटले आहे. मेनन यांच्याकडून ‘मंजू वॉरियर फाऊंडेशन’चे लेटर पॅड आणि तिने साईन केलेल्या कोºया चेकचा गैरवापर होण्याची भीतीही तिने व्यक्त केली आहे.

मंजूने केवळ तक्रार दाखल केली नाही तर काही डिजिटल पुरावेही सादर केलेत.  मंजूने मेनन यांच्या ‘ओडियन’ या चित्रपटात काम केले होते.  गतवर्षी 14 डिसेंबरला प्रदर्शित झालेला हा चित्रपट मेनन यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. मेनन यांनी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. याऊपरही चित्रपट आपटला होता.

मेनन यांनी या अपयशाचे खापर मंजूच्या डोक्यावर फोडले होते. ‘मंजूचा मार्केट बेस नाही. पुर्वायुष्यातील चांगल्या कर्मामुळे तिला ही भूमिका मिळाली होती,’ असे मेनन म्हणाले होते. मंजू व मेनन यांनी अनेक जाहिरातींसाठी एकत्र काम केले होते.  

मंजू ही मल्याळम अभिनेता दिलीपची पत्नी होती. 2015 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला होता. दिलीपवर एका अभिनेत्रीचे अपहरण करून तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती.

टॅग्स :Tollywood