कोरोना व्हायरसचा भारतात फैलाव झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही सेवा सुरू नाहीयेत. देशभरातील हॉटेल, बार बंद असल्याने सध्या तळीराम प्रचंड बैचेन झाले आहेत. दारू प्यायची रोजची सवय असल्याने काही जणांची तर अवस्था अतिशय बिकट झाली आहे. दारू न मिळाल्याने एका अभिनेत्रीच्या मुलाने चक्क आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, दाक्षिणात्य अभिनेत्री मनोरमा यांचा मुलगा भुपतीला दारूचे प्रचंड व्यसन आहे. पण सध्या लॉकडाऊनमुळे दारू मिळत नसल्याने त्याने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने झोपेच्या गोळ्या जास्त घेतल्याने सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण याबाबत मनोरमा अथवा त्यांच्या कुटुंबियांनी काही न बोलणेच पसंत केले आहे. मीडियाने याबाबत वृत्त दिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. मनोरमा या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे.
कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जगभरात अनेक ठिकाणी लोकांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे.