Join us

​‘बिग बॉस’च्या घरात लग्न करणारी ‘ही’ अभिनेत्री दुबईत साजरा करतेय लग्नाचा पहिला वाढदिवस!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 7:34 AM

‘बिग बॉस10’मध्ये आपल्या अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सध्या कुठे आहे? तर दुबईत. होय, मोनालिसा सध्या दुबईत आहे .

‘बिग बॉस10’मध्ये आपल्या अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सध्या कुठे आहे? तर दुबईत. होय, मोनालिसा सध्या दुबईत आहे आणि येथे  पती विक्रांत सिंह राजपूत  लग्नाचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट करतेय. मोनालिसाने ‘बिग बॉस’च्या घरात विक्रांतसोबत लग्न केले होते. अनेकांनी मोनालिसाच्या या लग्नाला पब्लिसिटी स्टंट ठरवले होते. पण मोनालिसा व विक्रांतचे हे लग्न केवळ ‘बिग बॉस’चा टीआरपी वाढवण्यासाठी नव्हते तर त्यांनी खरोखरीच प्रेक्षकांना साक्षी मानत लग्न केले होते. या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. अशात लग्नाची फर्स्ट एनिवर्सरी साजरी करणे तर बनतेच. या सेलिब्रेशनसाठी मोनालिसा व विक्रमने दुबईची निवड केली. या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ मोनालिसाने तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. मोना व विक्रांतच्या लोकप्रीय जोडीने ‘नच बलिये’ या रिअ‍ॅलिटी डान्स शोमध्येही आपला जलवा दाखवला होता. आता ही जोडी मोठ्या पडद्यावरही परतते आहे. होय, ‘पाकिस्तान में जय श्रीराम’ या भोजपुरी चित्रपटात ही जोडी दिसतेय. बिहारात येत्या २६ जानेवारीला हा चित्रपट रिलीज होतो आहे.मुंबई आणि गुजरातेत हा चित्रपट आधीच रिलीज झालाय आणि त्याला लोकांचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळतोय. ‘बिग बॉस10’नंतर मोनालिसानेही भोजपुरी पडद्यावर दमदार वापसी केली आहे.ALSO READ : Bigg Boss 10: विक्रांतबरोबर लग्न करण्यासाठी मोनालिसाला मिळाले होते चक्क 50 लाख!मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे. २००८ मध्ये ‘भोेले शंकर’ या भोजपुरी चित्रपटातून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. अलीकडे एका मुलाखतीत मोनालिसा भोजपुरी चित्रपटांबद्दल बोलली होती. भोजपुरी चित्रपटांच्या वाट्याला प्रशंसेपेक्षा तुच्छताच अधिक येते, असे तिने म्हटले होते. अर्थात असे असले तरी याच भोजपुरी सिनेमांनी मला अपार यश दिलेयं, हेही तिने मान्य केले होते. मी भोजपुरी सिनेमात येऊन जवळपास सात-आठ वर्षे झाली आहेत. या आठ वर्षांत भोजपुरी सिनेमा बराच बदलला आहे. आमची चित्रपटसृष्टी हळूहळू प्रगती करते आहे. मी आज जे काही आहे, ते भोजपुरी सिनेमांमुळेच, असे ती म्हणाली होती.