मृणाल ठाकूर ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मृणालने साऊथ, मराठी आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये काम केलं आहे. मृणालचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही मृणाल चाहत्यांना देत असते.
नुकतंच मृणालने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री ब्रायडल लूकमध्ये दिसत आहे. मृणालने या व्हिडिओत लाल रंगाची साडी नेसून नवरीसारखा पारंपरिक लूक केला आहे. हातात हिरव्या बांगड्या, डोक्याला मुंडावळ्या बांधल्याचंही दिसत आहे. एका प्रोजेक्टसाठी तिने हा लूक केला होता. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
एका चाहत्याने मृणालच्या या व्हिडिओवर कमेंट करत थेट तिला लग्नाची मागणीच घातली आहे. "अशी बायको असेल तर मी आता लग्न करायला तयार आहे", अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. त्याच्या या कमेंटवर मृणालने मजेशीर रिप्लाय दिला आहे. मृणालने चाहत्याला उत्तर देत "यशस्वी भव" असं म्हणत हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.
'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणालने मालिकेतून पदार्पण केलं होतं. या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये मृणालने काम केलं आहे. 'सिता रामम', 'द फॅमिली स्टार', 'बाटला हाऊस', 'सन ऑफ सरदार' या सिनेमांमध्ये ती दिसली होती.