Join us

"हॅपी बर्थडेच्या ऐवजी शोक व्यक्त करा" असं का म्हणाल्या अभिनेत्री नीना गुप्ता? Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 13:00 IST

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख तयार केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख तयार केली आहे. काल त्यांचा ६० वा वाढदिवस होता. वयाच्या साठीतही त्या अतिशय चिरतरुण आहेत. त्यांनी आपल्या घरीच मुलीसोबत वाढदिवस साजरा केला. कारण त्यांना वाढदिवसाला फारसं सेलिब्रेशन केलेलं आवडत नाही. 'हॅपी बर्थडे' च्या ऐवजी शोक व्यक्त करा असं त्या म्हणाल्या आणि चाहत्यांना धक्काच बसला. त्यांच्या या वक्तव्यामागचं कारण त्यांनी व्हिडिओ पोस्ट करत सांगितलं आहे. 

नीना गुप्ता यांची लेक फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने (Masaba Gupta) इन्स्टाग्रावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात ती आईला म्हणते आज तुझा वाढदिवस आहे. तेव्हा नीना गुप्ता म्हणतात, "हो आज माझा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी मला हा शर्ट गिफ्ट केलात त्याबद्दल धन्यवाद."

यानंतर मसाबा आईला विचारते, वाढदिवसाबद्दल तुझे काय विचार आहेत? यावर नीना गुप्ता म्हणतात, " मला वाटतं ६० व्या वर्षांनंतर येणाऱ्या वाढदिवसाला जसा माझा आज वाढदिवस आहे तर लोकांनी हॅपी बर्थडेच्या ऐवजी शोक व्यक्त केला पाहिजे. कारण आपलं आयुष्य कमी कमी होत जातं. त्यामुळे असं काही सेलिब्रेशन वगैरे करण्याची गरज नाही. मी अशीच घरी बसेन, आवडते खाण्याचे पदार्थ बनवेन आणि माझ्या कुटुंबासोबत बसून खाईन."

नीना गुप्ता यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा भडिमार केला आहे. 'तुमच्यासारखं कोणीच नाही नीनाजी','आम्ही तुमचा खूप आदर करतो, तुमचं काम खूप आवडतं' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. नीन गुप्ता या त्यांच्या नॅचरल अभिनयासाठी आणि सरळ साध्या वागणूकीसाठी ओळखल्या जातात.

टॅग्स :नीना गुप्ताबॉलिवूडसोशल मीडिया