Join us

अभिनेत्री नीना गुप्ताचा पबमधील डान्सरसोबत केलेल्या बेली डान्सचा व्हिडीओ होतोय व्हायरल, पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 15:28 IST

अभिनेत्री नीना गुप्ता बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असतात.

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असतात. त्या सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात. नीना गुप्ता यांनी नुकताच त्यांनी एक दमदार डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नीना एका डान्सरसोबत बेली डान्स करताना दिसत आहे. नीना गुप्ता यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

नीना गुप्ता यांनी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये नीना गुप्ता डान्सरसोबत बेली डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत नीना गुप्ता यांनी वेस्टर्न लूक केला आहे. पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस त्यांनी परिधान केलेला आहे. त्यांची स्टाईल चाहत्यांना खूप भावते. नीना गुप्ता यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, 'और अब रुप परिवर्तन'. 

नीना गुप्ता यांच्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. त्यावर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. एका युजरने 'ऑलवेज ऑन फायर' असे लिहिले आहे.

तर दुसऱ्या एका यूजरने म्हटले की, मला फक्त तुमच्यासारखे व्हायचे आहे. बेबाक, बिंदास और एकदम् झक्कास ', तर कोणी  'ये गजाब का परिवर्तन है ' असे कमेंट पहायला मिळत आहेत. 

टॅग्स :नीना गुप्ता