कलाकारांचे प्राणीप्रेम हे वेळोवेळी दिसून आले आहे.जवळपास सगळ्याच कलाकारांच्या घरी कुत्री, मांजरी असे पाळीव प्राणी आहेत. कलाकारांचे या प्राण्यासोबत एक वेगळेच नाते पाहायला मिळते. प्राण्यांवर कलाकार खूप पैसेही खर्च करतात. ‘मुन्ना मायकल’ फेम अभिनेत्री निधी अग्रवालकडे गोल्डन रिट्रीव्हर जातीचा एक पाळीव श्वान आहे. निधीसाठी तो एक केवळ प्राणी नसून तिच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
तिने या श्वानाला ‘कोको असे नाव दिले आहे. बर्याचदा तिच्या कोकोसह निधी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. नेहमीच कोकोसह क्वॉलिटी टाईम स्पेंड करताना दिसते. पण नुकताच ‘कोको’ हरवला आहे. त्याला शोधून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. कोकोसाठी शोध मोहिमही सुरु करण्यात आली आहे. इतकंच काय तर कोकोला शोधून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
कोकोची पाहता क्षणी ओळख पटावी म्हणून खास माहितीही शेअर केली आहे.गोल्डन रिट्रीव्हर जातीचा हा श्वान आहे. त्याच्या गळ्यात गुलाबी रंगाचा बेल्ट असून त्यावर डायमंड स्टड्स आहेत, याने तो सहज ओळखला जाऊ शकतो.
तसेच हृदयविकाराचा त्रास असलेला हा 8 वर्षांचा वृद्ध श्वान असल्याचेही तिने नमूद केले आहे. कोको अत्यंत शांत आणि फ्रेंडली असल्याचेही तिने म्हटले आहे.कोकोला आदल्या दिवशी सकाळी 7:27 वाजता देवट प्लाझा, रेसिडेन्सी रोड, शांतला नगर, अशोकनगर बेंगळुर जवळ शेवटचे पाहिले गेले होते. जो कोणी तिला कोको शोधण्यास मदत करले त्याला बक्षीस म्हणून 1 लाख रुपये देणार अशी घोषणा करण्यात आली आहे.
निधीने २०१७मध्ये अभिनय करिअरला सुरुवात केली होती. तिने बॉलिवूडमधील ‘मुन्ना माइकल’ या सिनेमात काम केले. त्यानंतर तिने २०१८ आणि २०१९मध्ये काही तेलुगू सिनेमांमध्येही काम केले. ज्यामध्ये ‘सव्यसाची’, ‘मिस्टर मजनू’, ‘आईस्मार्ट शंकर’ या सिनेमांचा समावेश आहे. आता निधीचे ‘भूमि’ आणि ‘पूनगोडी’ हे तामिळ सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.