Join us

नागा चैतन्य - समंथाचा 'या' अभिनेत्रीमुळे मोडला संसार,अफेअरच्या चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 1:24 PM

नागा चैतन्यने यापूर्वी 2 ऑक्टोबर रोजी इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट शेअर केली होती.

तेलगू स्टार नागा चैतन्य पत्नी सामंथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर, शनिवारी इंस्टाग्रामवर पुन्हा सक्रीय झाला आहे. समंथापासून विभक्त झाल्याच्या घोषणेनंतर नागा चैतन्यने इन्स्टाग्रामपासून ब्रेक घेतला होता. सोशल मीडियावरुन तो गायब असल्यामुळे त्याचे चाहते त्याला खूप मिस करत होते. आता इतक्या दिवसांनी पहिल्यांदाच तो इंस्टाग्रामवर परतला आहे आणि पोस्ट शेअर केली आहे. मात्र, यादरम्यान तो ट्विटरवर नक्कीच सक्रिय होता. नागा चैतन्यने यापूर्वी 2 ऑक्टोबर रोजी इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट शेअर केली होती. गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटामुळे चर्चेत असलेला नागा चैतन्य आता आणखी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रिया भवानीसह त्यांची जवळीक वाढत असल्याच्या चर्चा आहेत. दोघांचे अफेअर सुरु असल्याचे बोलले जात आहे. इतकंच नाही तर प्रिया भवानीमुळे समंथा आणि नागा चैतन्यचा घटस्फोट झाल्याच्याही चर्चा आहेत. समंथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटानंतरच प्रिया भवानी अचानक लाईमलाइटमध्ये आली आहे. 

तर दुसरीकडे घटस्फोट घेतल्यानंतर समंथादेखील सावरल्याचे पाहायला मिळत आहे. नागा चैतन्यला विसरत यंदाची दिवाळी राम चरणसोबत समंथा साजरी करताना दिसली होती. समंथाचेही आता नागा चैतन्यपासून वेगळे झाल्यानंतर पुन्हा ती प्रेमात पडल्याच्या चर्चा आहेत. तुर्तास या सगळ्या चर्चाच आहेत. यावर अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

लग्नानंतर सामंथाने तिचे सिनेमा करिअर सुरु ठेवले होते. सिनेमात बोल्ड सीन्स देणे,इतकेच नाहीतर ग्लॅमरस फोटोशूटही ती करायची.हीच बाब पति नागा चैतन्य आणि सासरे नागार्जुन यांना या गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या. समांथाला याविषयी अनेकदा दोघांनी समजवण्याचा प्रयत्न केला होता. अक्किनेनी घराची सून बनल्यानंतर समांथाने सासू अमाला अक्किनेनीसारखेच वागायला हवे अशी सगळ्यांची अपेक्षा होती.समांथाला तिच्या घरच्यांचा कामासाठी विरोध करणे खटकत होते. अखेर याच कारणामुळे दोघांचा घटस्फोट झाल्याचे बोलले जाते. 

टॅग्स :समांथा अक्कीनेनी