Join us  

आता अशी दिसते सैफ अली खानची हिरोईन,गंभीर आजारामुळे बॉलिवूडपासून झाली दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 12:19 PM

1993 मध्ये आलेल्या 'आंखे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या रागेश्वरीला 2000 साली पॅरालिसिसचा अटॅक आला होता. यामुळे तिची अवस्था अशी झाली होती की ती तिच्या शरीराची डावी बाजू निकामी झाली होती.

गोविंदा आणि चंकी पांडेसोबत 90 च्या दशकात 'आँखे' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री रागेश्वरी लूंबा 43 वर्षांची झाली आहे. मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटात देखील ती सैफ अली खानच्या नायिकेच्या भूमिकेत झळकली होती.याशिवाय रागेश्वरीने 'आंखे', 'दिल आ गया', 'जिद', 'दिल कितना नादान है', 'तुम जिओ हजार साल' आणि 'मुंबई से आया मेरा दोस्त' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय तिने अनेक टीव्ही शो होस्ट केले आहेत.

 रागेश्वरी ही खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली गायिका होती. तिचे 'मेड इन इंडिया' हे गाणे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.25 जुलै 1977 रोजी मुंबईत जन्मलेली रागेश्वरी सध्या ग्लॅमर जगापासून दूर तिच्या खासगी आयुष्य एन्जॉय करते. लहानपणापासूनच अनेक ब्रँड्ससाठी मॉडेलिंग करणारी रागेश्वरी पॅरालिसिसचा तिला सामना करावा लागला. या आजारामुळे  तिला नीट बोलताही येत नव्हते.

1993 मध्ये आलेल्या 'आंखे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या रागेश्वरीला 2000 साली  पॅरालिसिसचा अटॅक आला होता. यामुळे तिची अवस्था अशी झाली होती की ती तिच्या शरीराची डावी बाजू निकामी झाली होती. त्याचवेळी रागेश्वरीला मोठी ऑफरही मिळाली होती 'कोका कोला'सोबत  देशभर कॉन्सर्ट करणार होती. यातून ती लवकर बरी होईल असे सगळ्यांनाच वाटले होते. एक वर्ष फिजिओथेरपी, इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन आणि योगावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे ती या आजारातून लवकर बरी झाली.

रागेश्वरीने लंडनस्थित ह्यूमन राइट्स लॉयर सुधांशु स्वरुप यांच्याशी लग्न कर संसार थाटला.रागेश्वरी आणि सुधांशू यांनी 27 जानेवारी 2014 रोजी त्यांचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांमध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले.रागेश्वरीच्या लग्नात जूही चावला, सुष्मिता सेन, पूजा बेदी, राजू हिरानी, कृषिका लुल्ला, पुनीत इस्सर सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर रागेश्वरी लंडनलाच स्थायिक झाली.तिला एक मुलगी आहे जिचा जन्म 11 फेब्रुवारी 2016 रोजी झाला होता.

टॅग्स :सैफ अली खान