समीक्षांची पसंती मिळवलेल्या विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'पटाखा' चित्रपटातून अभिनेत्री राधिका मदनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पटाखानंतर राधिका तिच्या आगामी सिनेमाच्या प्रदर्शनाबद्दल खूप उत्सुक आहे. राधिकाचा आगामी 'मर्द को दर्द नहीं होता' या सिनेमाने टोरोंटो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात भरभरून प्रशंसा मिळवली आहे. सिनेमाच्या तयारी निमित्त राधिकाने गेले वर्षभर मार्शल आर्टस्चे प्रशिक्षण घेतले आहे. इतकेच नाही तर आता राधिकाने टॅप डान्सही शिकली आहे. फार कमी लोकांना माहित असेल पण अभिनयक्षेत्रात यायच्या आधी राधिका नवी दिल्लीत नृत्य शिक्षक म्हणून काम करायची.
'नृत्य ही माझ्यासाठी सहज करण्यासारखी बाब आहे. त्यात मला केव्हापासून टॅप डान्स शिकायचा होता. नवीन नृत्यप्रकार शिकण्याबरोबरच या कलेतून मला फिट राहण्यासाठीची एक नवीन संधी मिळत आहे' असे राधिका सांगते.
राधिकाचा बॉलिवूडशी कुठलाही संबंध नाही. म्हणजेचं, तिने अतिशय संघर्षाने स्वबळावर अभिनय क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ‘छुरियां’ हा चित्रपटही राधिकाला याच मेहनतीच्या जोरावर मिळाला. या चित्रपटासाठी ६० मुलींचे ऑडिशन घेतले गेले होते. यातून राधिकाची निवड झाली. आपल्या प्रतिभेच्या जोरावर राधिकाने ही भूमिका आपल्या खिशात टाकली.