Join us

Rakhi Sawant-Mukesh Ambani : राखी सावंतसाठी मुकेश अंबानी सरसावले, आईच्या उपचारासाठी करतायत मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 8:33 AM

राखी सावंतची आई जया यांना ब्रेन ट्युमर झाला आहे. यावरील उपचारासाठी त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या खूप अडचणीत आहे. एकीकडे राखीच्या वैवाहिक जीवनाची समस्या दिसत आहेत. तर दुसरीकडे राखीची आई आजारी आहे. राखी सावंतची आई यापूर्वी कॅन्सरने त्रस्त होती. कर्करोगानंतर त्यांना ब्रेन ट्युमर झाल्याती माहिती समोर आली होती. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नुकतेच राखीने तिच्या आईच्या आजाराबद्दल सांगितले. दरम्यान, उद्योजक मुकेश अंबानी आपल्या आईच्या उपचारात मदत करत असल्याचेही तिनं सांगितलं.

राखी सावंतनं आपल्या आईच्या आजाराबद्दलही सांगितलं. “आई ओळखू शकत नाहीये, तिला खाताही येत नाहीये, तिचं अर्ध शरीर पॅरलाईज झालंय,” असं राखी म्हणाली. यानंतर तिनं मुकेश अंबानी यांचे आभारही मानले. “मी अंबानीजींचे आभार मानते. ते माझ्या आईच्या उपचारासाठी मदत करत आहेत. रुग्णालयात जी अधिक प्राईज आहे ती कमी करा,” असंही तिनं सांगितलं. 

आपल्या आईला दोन महिन्यांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचंही राखीनं सांगितलं. राखीचा व्हिडीओ पाहून सर्वज जण तिच्या आईसाठी प्रार्थना करत आहेत.

राखीच्या आईला ब्रेन ट्यूमरसोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राखी सावंतने सांगितलं होतं की, बिग बॉस मराठी सीझन ४ मधून बाहेर पडली. "मी बाहेर येताच मला कळलं की आईची तब्येत ठीक नाही. आम्ही आता हॉस्पिटलमध्ये आहोत. आईला कॅन्सर आहे आणि आता तिला ब्रेन ट्यूमर झाला आहे. तुम्ही कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा. माझ्या आईला प्रार्थनांची गरज आहे" असं राखीनं यापूर्वी सांगितलं होतं. 

टॅग्स :राखी सावंतमुकेश अंबानी