Join us

Then And Now: सध्या कुठे आहे Salman Khanच्या Judwaa सिनेमातील अभिनेत्री? आताच फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 15:51 IST

रजनीकांत(Rajinikanth), अक्षय कुमार(Akshay Kumar), गोविंदा(Govinda), मिथुन चक्रवर्ती(Mithun Chakraborty), अजय देवगण (Ajay Devgn) यांसारख्या सुपरस्टार्ससोबत तिने काम केले.

 ९० च्या दशकातील ही प्रसिद्ध अभिनेत्री होती, जिला तुम्ही सलमान खानसोबत 'जुडवा' चित्रपटात पाहिले असेल. ती साऊथची अभिनेत्री होती, पण ती ९० आणि २००० च्या दशकात बॉलिवूडमध्ये खूप सक्रिय होती. आम्ही बोलतोय अभिनेत्री रंभा(Rambha) बाबत. रंभाने घरवाली बहरवाली, क्रोध (क्रोध), बेटी नंबर 1 (बेटी नं. 1), क्योंकि मैं झूठ नहीं बोलता  (Kyo Kii... Main Jhuth Nahin Bolta),, जानी दुश्मन (Jaani Dushman)सह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होते.  रंभा केवळ सलमान खानसोबतच नाही तर तिच्या काळातील अनेक प्रसिद्ध स्टार्ससोबत काम करून चर्चेत आली.

रंभाने रजनीकांत(Rajinikanth), अक्षय कुमार(Akshay Kumar), गोविंदा(Govinda), मिथुन चक्रवर्ती(Mithun Chakraborty), अजय देवगण (Ajay Devgn)  यांसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केले.रंभाने कॅनाडातील बिझनेसमन इंद्रकुमारसोबत २०१० मध्ये लग्न करून संसार थाटला. आता तर तिच्या लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ओळखायलाही येत नाही. कारण तिच्या बराच फरक पडला आहे.

अभिनेत्रीला दोन मुली आणि एक मुलगा आहे. तिला दोन मुली लानिया आणि सशा आहेत. तर तिने २०१८ मध्ये एका मुलाला जन्म दिला. त्याचं नाव शिविन आहे.रंभा तिच्या परिवारासोबत आता भारतात राहत नाही. ती टोरांटोमध्ये राहते.

मात्र, 2008 मध्ये रंभाची एक बातमी खूप चर्चेत आली होती. अभिनेत्रीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी होती.खरं तर, रंभाला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर अभिनेत्रीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची अफवा पसरली होती. मात्र, नंतर रंभाने स्वत: सांगितले होते की, मी त्या दिवशी उपवास करत होते आणि चक्कर आल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

टॅग्स :रंभासलमान खानगोविंदाअजय देवगण