राणी मुखर्जी आज तिचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. राणींची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि सक्षम अभिनेत्रींमध्ये केली जाते. राणीने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. राणीने 1996 मध्ये 'राजा की आयेगी बारात' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर राणीने 'कुछ कुछ होता है', 'बंटी और बबली', 'कभी अलविदा ना कहना' आणि 'मर्दानी' सारखे हिट सिनेमे बॉलिवूडला दिले. तिच्या हिट चित्रपटांमुळे बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्येही तिची गणना होते.
राणी मुखर्जीला लक्झरी लाइफ जगायला आवडते. ती पती आदित्य आणि मुलगी आदिरासोबत मुंबईत राहात असली तरी अभिनेत्रीने वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी विकत घेतली आहे. नुकतेच तिने एक अपार्टमेंट घेतले आहे, ज्याची किंमत 7 कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
लग्झरी कार राणी मुखर्जीला महागड्या आणि आलिशान गाड्यांची खूप आवड आहे. राणीकडे Audi A8 W12 आहे ज्याची किंमत सुमारे 2 कोटी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार राणीला तिचा पती आदित्यने गिफ्ट म्हणून दिली होती. याशिवाय तिच्याकडे मर्सिडीज एस क्लास आणि मर्सिडीज बेंझ ई क्लास कारही आहेत. ही खूप गाड्यांची किंमत कोट्यवधी रुपये आहे.
नेटवर्थ आजकाल राणी मुखर्जी फार कमी आणि निवडक चित्रपटांमध्ये काम करत आहे. ती अखेरची बंटी और बबली २ या चित्रपटात दिसली होती. आता राणी मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे चित्रपटात दिसणार आहे. ती तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी मोठी रक्कम मानधन म्हणून घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राणी मुखर्जीची एकूण संपत्ती 12 मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 90 कोटी रुपये आहे.