बॉलिवूडच्या सौंदर्यवती अभिनेत्री रेखा या कित्येक दशकांपासून सिनेइंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवत आहेत. त्या त्यांच्या सौंदर्य व अदाकारीसाठी ओळखल्या जातात. पन्नास वर्षांच्या करियरमध्ये त्यांनी जवळपास १८० चित्रपटात काम केले आहे. करियरच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये सावळ्या रंगामुळे त्यांना खूप टीका ऐकावी लागली होती.
रेखा यांनी ६०च्या दशकात आपल्या सिनेकरियरला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. रेखा काही दिवसांपूर्वी एका डान्स शोमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी १९७९ साली अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुहाग चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक रंजक किस्सा सांगितला. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, रेखा यांनी सांगितले की, चित्रीकरणादरम्यान त्या दुर्गा देवीच्या मूर्तीच्या मागे जाऊन डुलकी घ्यायच्या. कारण कॅमेऱ्यासमोर फ्रेश वाटेल.
त्याच्याआधी २०१४ साली शर्मन जोशी अभिनीत सुपर नानी चित्रपटात त्या दिसल्या होत्या.