Join us

राज कपूरच्या 'बॉबी'ची ऑफर नाकारुन रेखाची बहीण आलेली चर्चेत; एकेकाळी सौंदर्याच्याबाबतीत रेखाला देत होती टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 11:50 AM

Rekha: राज कपूर यांचा 'बॉबी' या चित्रपटामध्ये अभिनेत्री डिंपल कपाडियाने मुख्य भूमिका साकारली होती. मात्र, या भूमिकेसाठी राज कपूर यांनी राधाला पहिली पसंती दिली होती.

उत्तम अभिनयापेक्षाही सौंदर्यामुळे कायम चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणजे रेखा(Rekha). आजवरच्या कारकिर्दीत रेखाचे असंख्य चित्रपट गाजले. या चित्रपटांसोबतच तिची पर्सनल लाइफ आणि खासकरुन सौंदर्य हे चाहत्यांमध्ये कायम चर्चेत राहिलं. एकेकाळी रेखाचं संपूर्ण कुटुंबच कलाविश्वात सक्रीय होतं. तिचे आई-वडील दाक्षिणात्य कलाविश्वातील प्रसिद्ध कलाकार होते. इतकंच नाही तर तिच्या सख्खा बहिणीलाही बॉलिवूडमधून अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या होत्या. मात्र, तिने या ऑफर नाकारल्याचं म्हटलं जातं. इतकंच नाही तर रेखाची बहीण सौंदर्याच्या बाबतीत तिच्या तोडीस तोड होती. त्यामुळेच या बहिणीविषयी आज जाणून घेऊयात.

रेखाच्या आईचं नाव पुष्पावल्ली असं होतं. पुष्पावली साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांना रेखा आणि राधा (Radha) या दोन मुली. यातील रेखाने साऊथसह बॉलिवूडमध्येही नाव कमावलं. तर, राधा कलाविश्वापासून दूरच राहिली. सूत्रांच्या माहितीनुसार, राधाने काही साऊथ चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तसंच काही मॅगझीनवरही ती झलकली होती. विशेष म्हणजे त्या काळी राधाने राज कपूर यांच्या गाजलेल्या बॉबी चित्रपटासाठी नकार दिला होता.

राज कपूर यांचा 'बॉबी' या चित्रपटामध्ये अभिनेत्री डिंपल कपाडियाने मुख्य भूमिका साकारली होती. मात्र, या भूमिकेसाठी राज कपूर यांनी राधाला पहिली पसंती दिली होती. मात्र, या चित्रपटासाठी राधाने नकार दिला. परिणामी, या चित्रपटात डिंपलला कास्ट करण्यात आलं.

दरम्यान, त्या काळी राधाने अनेक मॅगझीनसाठी काम केलं होतं. त्यावेळी ती टॉप मॉडेलपैकी एक होती त्यामुळे तिच्या सौंदर्याची चर्चा कायम व्हायची.  राधाने १९८१ मध्ये उस्मान सईद यांच्यासोबत लग्न केलं आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली. उस्मान सईद हे प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एम. अब्बास यांचे लेक आहेत.  लग्नानंतर राधाने तिचं नाव बदलून राबिया केलं. त्यांना नाविद आणि अमन ही दोन मुलंदेखील आहेत.

टॅग्स :रेखाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा