टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दिलैकला नुकतेच उप्स मोमेंटचा सामना करावा लागला. एरव्ही इन्स्टावर हॉट फोटो अपलोड करणाऱ्या रुबीनाला तेव्हा मात्र सावरता सावरता नाकीनऊ आले होते. रुबीना दिलैकचा एक लेटेस्ट व्हिडीओ समोर आला आहे.
रुबीना शुटिंगच्या सेटवर जात होती, तेव्हा तिला फोटोग्राफर्सनी गाठले. रुबीनाने जांभळ्या रंगाचा गाऊन ड्रेस घातला होता. या ड्रेसला हाय स्लिट होता, जो तिच्या सौदर्यात आणि हॉटनेसमध्ये भर घालत होता. त्यानेच घात केला. भर रस्त्यात असताना वाऱ्याचो झोका आला आणि तिचा ड्रेस उडाला. या प्रसंगातून सावरताना रुबीनाला मात्र नाकीनऊ आले होते. यामुळे रुबीनाने फोटोग्राफर्सना अधिक पोझ न देता आतमध्ये जाणे पसंद केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रुबिना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिच्या नवीन फोटोशूटची छायाचित्रे चाहत्यांसोबत शेअर करत असते. रुबिनाचे चाहते तिच्या सौंदर्यासोबतच फॅशन आणि ड्रेसिंग सेन्सचेही खूप वेडे आहेत.
टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस सीझन 14 (bigg boss 14 winner)ची विजेती रुबिना दिलैक (Rubina dilaik)ने खुलासा केला की 2011 मध्ये एका निर्मात्याने तिची 16 लाखांची फसवणूक केली होती, ज्यामुळे अभिनेत्रीवर तिचे घर आणि दोन गाड्या विकण्याची आली होती वेळ. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, प्रॉडक्शन हाऊसने शूटिंगला उशीर झाल्यामुळे झालेल्या नुकसानाबाबत दाखवलेले सर्व रेकॉर्ड खोटे होते. मात्र अभिनेत्री तिच्या कमिटमेंटमुळे मजबूर होती, त्यामुळे तिला इतके मोठे पाऊल उचलावे लागले होते.