समांथा रुथ प्रभू ही साउथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. समांथा सध्या तिचा चित्रपट शकुंतलम आणि आगामी वेब सीरिज सिटाडेलमुळे चर्चेत आहे. त्याचवेळी तेलुगू निर्माता चिट्टीबाबू यांनीही सामंथाच्या ‘शकुंतलम’ या चित्रपटाबाबत वक्तव्य केले होते. समांथाचं करिअर संपलंय. आता तिच्या करिअरमध्ये काहीही उरलेलं नाही, असा दावा त्रिपुरनेनी चिट्टी बाबू केला होता. यावर समंथाने कोणतीच प्रतिक्रिया अद्याप दिली नव्हती. मात्र आता तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री समांथाने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा पहिला फोटो ती फक्त 16 वर्षांची होती. यानंतर तिने आपल्या कुत्र्यांचे फोटो शेअर केले आणि नंतर ऑक्सिजन मास्क घातलेला त्याचा फोटो शेअर केला. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने खुलासा केला होता की तिला मायोसिटिस या आजाराने ग्रासलं. या आजारावर मात करण्यासाठी अभिनेत्री हायपरबेरिक थेरपी घेते. ही थेरपी घेतानाचा एक फोटोही तिने शेअर केला आहे. यासोबतच अभिनेत्रीने आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये लिहिले आहे - जो झाड लावतो त्याला माहिती असते की तो या झाडाच्या सावलीत कधीही बसणार नाही, त्याला आयुष्याचा अर्थ कळू लागला आहे. या ओळी रवींद्रनाथ टागोरांनी लिहिल्या आहेत. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले - जसे मी ते पाहते आहे.
'फिल्मीबीट'ला दिलेल्या मुलाखतीत त्रिपुरनेनी चिट्टी बाबू यांनी समांथाच्या करिअरबद्दल काही धक्कादायक गोष्टी बोलून दाखवल्या. समांथा ज्या प्रकारे चित्रपटाचं प्रमोशन करतेय, ते पाहून त्यांनी काहीशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले चिट्टी बाबू'शाकुंतलम'च्या प्रमोशनदरम्यान समांथा भावुक झाली होती. ती पर्सनल लाईफबद्दल बोलताना अक्षरश: रडली. याबद्दल छेडलं असता चिट्टी बाबूंनी हे सगळं नकली असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, ते सगळं नकली होतं. शंकुतला बनण्यासाठी तिला काय काय सहन करावं लागलं, हे समांथाने रडत रडत सांगितलं. पण सगळे कलाकार तितकीच मेहनत करतात. यशोदाच्या प्रमोशनवेळीही ती अशीच रडली. हे योग्य नाही. हा फक्त सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. अनेक कलाकार आपल्या भूमिकेसाठी नको इतकी मेहनत करतात. पण सामंथा या नावावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतेय. याला सस्ती पब्लिसिटी म्हणतात. समांथाचं वजन घटलंय. तिचा चेहराही बदलला आहे. ती आजारी झाली आणि आता प्रत्येक चित्रपटासाठी ड्रामा करतेय. सोशल मीडियावर तिचे रडके फोटो व्हायरल झालेत. हे सगळं पब्लिसिटीसाठी होतं. अनेक कलाकार आजारी असतानाही काम करतात. पण त्यांनी कधीच अशी सहानुभूती मिळवली नाही. समांथाचं स्टारडम व चार्म संपला आहे. ती एक सुपरस्टार होती. पण आता तिचं करिअर संपलं आहे. त्यामुळे ती अशी सस्ती पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करतेय. परंतु लोक भावुक होऊन सिनेमाला गर्दी करत नसतात...