Join us

लग्नानंतर इंडस्ट्री सोडली, आता दुसऱ्यांदा गरोदर आहे सना खान, चाहत्यांना दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 16:02 IST

सनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

अभिनेत्री सना खान सिनेइंडस्ट्रीपासून दूर गेली असली तरी ती कायमच चर्चेत असते. सना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सना सध्या इंडस्ट्रीत काम करत नाही. तरीदेखील तिचा चाहता वर्ग कमी झालेला नाही. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकतंच सनाने चाहत्यांबरोबर एक गोड बातमी शेअर केली आहे. सना खान गरोदर असून ती लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. 

सनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. "अल्लाहच्या आशीर्वादाने आमचं तिघांचं कुटुंब आता चौघांचं होत आहे. सय्यद तारीक जामिल मोठा भाऊ होण्यासाठी उत्सुक आहे", असं या व्हिडिओत म्हटलं गेलं आहे. सनाच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. 

सना खान एकेकाळी मनोरंजन जगतातील लोकप्रिय आणि ग्लॅमरस चेहरा होता. तिने मालिका, चित्रपट आणि ओटीटी अशा तिन्ही माध्यमांत काम केले आहे. 'टॉयलेट एक प्रेम कथा' चित्रपटात केमिओ व्यतिरिक्त 'स्पेशल ऑप्स'मध्ये तिने केलेली भूमिका लोकप्रिय ठरली होती. परंतु २०२०मध्ये तिने अचानक सिनेइंडस्ट्रीला अलविदा केला. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता.

त्यानंतर २०२० मध्ये लॉकडाउननंतर तिने फोटो शेअर करत खुलासा केली की, तिने अनस सयैदसोबत निकाह केला आहे. त्यानंतर अनेकांना या वृत्तावर विश्वास ठेवणे कठीण झाले होते. तिच्या नवऱ्याला देखील यावरून ट्रोल केले होते. बऱ्याच कालावधीनंतर सना खानने स्वतः खुलासा केला की, शेवटी तिने इंडस्ट्री का सोडली. मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अल्लाहच्या मागार्चे अनुसरण करण्यासाठी ग्लॅमर दुनिया सोडत असल्याचे तिने जाहीर केले होते.

टॅग्स :सना खानप्रेग्नंसीसेलिब्रिटी