अभिनेत्री सेलिना जेटलीच्या आईचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 2:21 PM
अभिनेत्री सेलिना जेटलीच्या आईचे कर्करोगाने निधन झाले. सेलिनाने सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक अशी पोस्ट शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीच्या आईचे गेल्या शुक्रवारी (दि.८ जून) निधन झाले. त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या. सेलिनाने आईच्या आठवणीप्रीत्यर्थ सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक अशी पोस्ट लिहिली. पोस्टमध्ये सेलिनाने त्या सर्वांचे आभार मानले, जे दु:खद क्षणी त्यांच्यासोबत होते. सेलिनाने पोस्टमध्ये लिहिले की, एक हजार अश्रूही तुला परत आणू शकत नाहीत. हे मी चांगले जाणून आहे, कारण मी खूप अश्रू वाहिले आहेत. एक हजार शब्दही तुला परत आणू शकत नाहीत, कारण मी तसेही प्रयत्न केले आहेत. माझी प्रेमळ आणि सुंदर आई मीता जेटली ८ जून रोजी माझे प्रेमळ वडील कर्नल विक्रम कुमार जेटली यांच्याकडे गेली. पुढे तिने लिहिले की, एका धाडसी आर्मी मॅनची पत्नी, एक प्रोफेसर, माजी ब्यूटी क्वीन आणि सर्वात प्रेमळ आई. तिने अखेरच्या श्वासापर्यंत कॅन्सरशी लढा दिला. तिला संपूर्ण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. दरम्यान, सेलिनाच्या वडिलांचेही काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते. आता आईच्या निधनामुळे सेलिनाला मोठा धक्का बसला आहे. सध्या सेलिना बॉलिवूडपासून दूर असून, आपल्या परिवाराकडे अधिक लक्ष देऊन आहे.