'काँटा लगा' गर्ल शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) वयाच्या ४२ व्या वर्षीही आपल्या फिटनेसने सर्वांना घायाळ करते. तिचे हॉट लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी बिकिनी तर कधी ग्लॅमरस अवतारात ती दिसते. आता ४२ व्या वर्षी शेफालीला आई व्हायचं आहे. याबद्दल नुकतंच तिने पॉडकास्टमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या.
पारस छाबडाला दिलेल्या मुलाखतीत शेफालीने मूल दत्तक घेण्यासंबंधी इच्छा व्यक्त केली. शेफाली म्हणाली, "मी काही दिवसांआधी तुला म्हणाले होते की आम्ही सध्या आर्थिक तंगीत आहोत. पण आज मी चांगल्या स्थितीत आहे. माझ्याकडे हवं असलेलं सगळंच आहे. आम्ही आई बाबा होण्यासाठी तयार आहोत. हे कधीही होऊ शकतं. मला वाटतं जगात अशी बरीच मुलं आहेत ज्यांना घर नाहीए, त्यांना प्रेमाची गरज आहे. आम्ही सध्या त्या स्थितीत आहोत जिथे आम्ही मुलांना ते प्रेम देऊ शकतो. स्वत:च्या मुलांवर तर सगळेच प्रेम करतात. पण दुसऱ्याचं मूल जो घरी आणतो तो महान असतो."
ती पुढे म्हणाली, "मूल दत्तक घेणं हा असा निर्णय आहे ज्यामध्ये पती आणि कुटुंबाचा पाठिंबा असायला हवा. हा खूपच महत्वाचा निर्णय असतो. त्यामुळे सगळ्यांचीच याला सहमती असायला हवी. या प्रक्रियेला बराच वेळही जातो. आमच्या नशिबात असेल तर ते नक्की होईल. बाकी पुढे काय होतं बघूच."
शेफाली जरीवालाने २०१४ साली पराग त्यागीसोबत लग्न केलं. त्यांच्या लग्नाला १० वर्ष झाली. दोघंही सुखाचा संसार करत आहेत आणि आता त्यांना मूल दत्तक घेण्याची आस आहे.