Join us

सोनाक्षीला भारतात स्वीमिंग करायची वाटते भीती, म्हणाली- "कोणी लपून माझा..."

By देवेंद्र जाधव | Updated: February 27, 2025 14:10 IST

सोनाक्षीला भारतात स्वीमिंग करायची का भिती वाटते? अभिनेत्री मोठा खुलासा, काय म्हणाली बघा (sonakshi sinha)

बॉलिवूडची'दबंग गर्ल' अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा (sonakshi sinha). सोनाक्षीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. सोनाक्षीने सलमान खानसोबत (salman khan) बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सोनाक्षीने पुढे अक्षय कुमार, विजय वर्मापासून अनेक कलाकारांसोबत भूमिका साकारल्या. सोनाक्षीने अलीकडेच एका मुलाखतीत तिला भारतात स्वीमिंग करायला का भीती वाटते? याचा खुलासा करुन त्यामागचं कारण सांगितलं

सोनाक्षीला भारतात वाटते स्वीमिंगची भीती कारण...सोनाक्षी सिन्हाने हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, तिला स्वीससूट घालायला तितकं आवडत नाही. याशिवाय स्वीमसूट परिधान करताना कायम तिला कंफर्टेबल वाटत नाही. सोनाक्षी म्हणाली की,"मी कधीच मुंबईत किंवा भारतात स्वीमिंग केली नाहीये. कोणी कधी नकळत लपून माझा फोटो काढून तो इंटरनेटवर व्हायरल करेल, हे मला कळणार नाही." याशिवाय याच मुलाखतीत सोनाक्षीने वजनाचा न्यूनगंड वाटल्याने अभिनय क्षेत्रात एन्ट्री करायला मन तयार नव्हतं असंही सांगितलं.

तरुणींनी स्वतःच्या दिसण्याचा आणि शरीराचा तिरस्कार करता कामा नये. याशिवाय विशिष्ट प्रकारे सुंदर दिसण्यासाठी कोणताही बदल करण्याची गरज नाही, असं मत सोनाक्षीने व्यक्त केलंय. २०१० ला सलमान खानसोबत 'दबंग' सिनेमातून सोनाक्षीने पदार्पण केलं. २०२४ मध्ये सोनाक्षी 'बडे मिया छोटे मिया' आणि 'काकूदा' या सिनेमातून भेटीला आली. सोनाक्षीने काही महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत लग्न केलं. सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल सध्या कोणतेही नवीन अपडेट नाही. 

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाबॉलिवूड