Join us

आमिर खानच्या 'सरफरोश २'ची सोनाली बेंद्रेला ऑफर आहे का? अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 10:50 AM

'सरफरोश २' सिनेमाची सध्या चर्चा असून सोनाली बेंद्रे आमिर खानसोबत कॅमिओ करणार का? या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे (sonali bendre, aamir khan, sarfarosh 2)

१९९९ साली आलेला आमिर खानचा 'सरफरोश' सिनेमा चांगलाच गाजला. आजही बॉलिवूडचा क्लासिक सिनेमा म्हणून 'सरफरोश'चं नाव घेतलं जातं. आमिर खान, नसीरुद्दीन शाह, सुकन्या मोने, सोनाली बेंद्रे असे कलाकार 'सरफरोश'मध्ये बघायला मिळाले. जिंदगी मौत ना बन जाए याशिवाय होशवालोको खबर क्या ही 'सरफरोश'मधील गाणीही अजरामर झाली. 'सरफरोश'च्या दुसऱ्या भागात सोनाली बेंद्रे दिसणार का? असा प्रश्न विचारला असता तिने दिलेलं उत्तर चर्चेत आहे. 

'सरफरोश २' मध्ये सोनाली बेंद्रे दिसणार का?

सोनाली बेंद्रेने नुकतंच इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत 'सरफरोश'बद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या. 'सरफरोश'ला २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सोनाली म्हणाली, मला वाटतंय मी आता म्हातारी होत चाललीय. याशिवाय जेव्हा सोनालीला 'सरफरोश २' बद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ती फक्त हसली. आता जेव्हा 'सरफरोश २' येईल तेव्हा त्यात सोनाली असणार की नाही, हे पाहावं लागेल.

'सरफरोश' सिनेमाबद्दल...

३० एप्रिल १९९९ ला 'सरफरोश' सिनेमा रिलीज झाला. जॉन मैथ्यू यांनी 'सरफरोश'चं दिग्दर्शन केलं होतं. जॉन यांनीच सिनेमाची पटकथा लिहिली होती. या सिनेमातील आमिर खान-सोनाली बेंद्रे यांची जोडी लोकांना आवडली. आमिर खानने साकारलेली पोलिस ऑफिसर अजय सिंग राठोडची भूमिका चांगलीच गाजली. नसीरुद्दीन शाह यांनी सिनेमात गायक असलेल्या आतंकवाद्याची भूमिका साकारली होती. 

 

टॅग्स :सोनाली बेंद्रेमराठीआमिर खाननसिरुद्दीन शाहसुकन्या कुलकर्णी