Join us

Then and Now : ‘तिन्ही’ खानांमुळे या बोल्ड अभिनेत्रीने ठोकला बॉलिवूडला रामराम, आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 5:08 PM

सेक्स सीनमुळे आली होती चर्चेत

ठळक मुद्देमेन स्ट्रिम चित्रपटांत रोल न मिळाल्याने सोनूने काही बी-ग्रेड चित्रपटात काम केले आणि यानंतर अचानक बॉलिवूडमधून एक्झिट घेतली.

बॉलिवूडच्या अनेक नट्यांनी एक काळ गाजवला. पण आज यापैकी अनेकजणी प्रेक्षकांच्या विस्मृतीत गेल्या आहेत. काहींना तर आज ओळखताही येणार नाही, इतक्या त्या बदलल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. होय, 80 व 90 च्या दशकातील सुपरमॉडेल आणि अभिनेत्री सोनू वालिया ही एकेकाळची बोल्ड अभिनेत्री.  19 फेबु्रवारी 1964 रोजी दिल्लीच्या एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या सोनूने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली आणि पुढे ती बॉलिवूडमध्ये आली.

सोनूने १९८५ मध्ये ‘मिस इंडिया’ किताब जिंकला. यानंतर लगेच बॉलिवूडच्या ऑफर्स तिला मिळायला लागल्या. १९८८ मध्ये ‘आकर्षण’ या चित्रपटाद्वारे सोनूने बॉलिवूड डेब्यू केला. या चित्रपटात एका तलावाकाठी सोनूवर सेक्स सीन चित्रीत केला गेला आणि सगळीकडे खळबळ माजली. त्या काळात इतके हॉट दृश्य देण्यास नट्या धजावत नसत. पण सोनूने इतके बोल्ड दृश्य देण्याची हिंमत दाखवली आणि एका रात्रीत ती चर्चेत आली.

यानंतर राकेश रोशन यांनी सोनूला ‘खून भरी मांग’ या चित्रपटासाठी साईन केले. हा चित्रपट सोनूच्या करिअरमध्ये मैलाचा दगड ठरला. यातील भूमिकेसाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही तिने जिंकला.

यापश्चात महादेव, क्लर्क, महासंग्राम, हातिमताई, तेजा,नंबरी आदमी, प्रतिकार, दिल आश्ना है अशा डझनावर चित्रपटात सोनू दिसली. पण ‘खून भरी मांग’ सारखी जादू तिला दाखवता आली नाही. २००८ मध्ये आलेला ‘जय मां शेरावाली’ हा तिचा शेवटचा चित्रपट.

मेन स्ट्रिम चित्रपटांत रोल न मिळाल्याने सोनूने काही बी-ग्रेड चित्रपटात काम केले आणि यानंतर अचानक बॉलिवूडमधून एक्झिट घेतली. सोनू बॉलिवूडमधून अचानक का गायब झाली, यामागे खूप रोचक स्टोरी आहे. बॉलिवूडच्या तिन्ही ‘खान’मुळे सोनूने बॉलिवूडला रामराम ठोकला, हे तुम्हाला सांगूनही खरे वाटणार नाही. पण हे खरे आहे. खुद्द सोनूनेच एका मुलाखतीत हे कारण स्पष्ट केले होते.

बॉलिवूडच्या तिन्ही ‘खान’मुळे मला काम मिळणे बंद झाले आणि मी बॉलिवूडमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे सोनूने सांगितले होते. याचे कारण म्हणजे, सोनूची उंची. होय, बॉलिवूडच्या तिन्ही ‘खान’पेक्षा सोनूची उंची बरीच होती. सोनूच्या मते, त्या काळात उंच मुलींना फार चित्रपट मिळत नसे.

बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर तिने हॉटेल मालक सूर्य प्रकाश याच्याशी संसार थाटला. काही वर्षात सूर्य प्रकाश यांचे निधन झाले. यानंतर सोनूने अमेरिकेत राहणारे निर्माते प्रताप सिंहसोबत लग्न केले. दोघांचीही एक मुलगी आहे. सध्या सोनू मुंबईत राहते.

टॅग्स :बॉलिवूड