कंगना रणौतने खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी केलेल्या वक्तव्यावर बुधवारी प्रतिक्रिया दिली आणि दावा केला होता की, तिला तर थाळी सजवून काहीही मिळालं नाही. मंगळवारी जया बच्चन राज्यसभेत म्हणाल्या होत्या की, इंडस्ट्रीबाबत सोशल मीडियावर वाईट बोललं जात आहे. सरकारने सुरक्षा द्यावी आणि इंडस्ट्रीची साथ देण्याची मागणी त्यांनी केली होती. अशात कंगनाने जया बच्चन यांना दिलेल्या उत्तरावर अभिनेत्री स्वरा भास्करने प्रतिक्रिया दिली आहे.
स्वराचं कंगनाला उत्तर
'तनु वेड्स मनु'मध्ये कंगनासोबत काम करणारी अभिनेत्री स्वरा भास्करने कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, 'तुझ्या डोक्यातील घाण तुझ्यापर्यंतच ठेव. जर तुला मला शिव्या द्यायच्या तर दे. मी आनंदाने तुझ्या ऐकून घेईन. तुझ्यासोबत चिखलात कुस्तीही खेळेन. मोठ्यांचा आदर करणं भारतीय संस्कृतीत शिकवलं जातं. तू एक स्वंयघोषित राष्ट्रवादी आहे'.
काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?
रवी किशन यांच्या विधानानंतर जया बच्चन म्हणाल्या होत्या की, ' आमच्या एका खासदाराने लोकसभेत बॉलिवूडच्या विरोधात वक्तव्य केले. हे लाजीरवाणे आहे. मी कोणाचे नाव घेत नाही. तो स्वत: इंडस्ट्री मधून आला आहे. ज्या ताटात जेवायचं त्यालाच छिद्र पाडायचं ही एक चुकीची गोष्ट आहे. इंडस्ट्रीला सरकारच्या संरक्षण आणि पाठिंब्याची आवश्यकता आहे. बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे असा आरोप त्यांनी केला होता.
कंगनाचा जया यांच्यावर पलटवार
कंगनाने जया बच्चन यांच्या वक्तव्यावर पलटवार केला. ती ट्विट करत म्हणाली की, जया बच्चन आणि त्यांच्या इंडस्ट्रीने मला कुठले ताट दिले आहे. एक ताट मिळाले होते ज्यामध्ये दोन मिनिटांचा आयटम्स नंबर्स आमि एका रोमँटिक सीनचा रोल मिळायचा तोसुद्धा हिरोसोबत शय्यासोबत केल्यानंतर. त्यानंतर मी या इंडस्ट्रीला फेमिनिझम शिकवला. तसेच हे ताट देशभक्ती आणि स्त्रीप्राधान्य असलेल्या भूमिकांना सजवले. जयाजी हे माझे स्वत:चे ताट आहे, असा टोला कंगनाने लगावला.
जया प्रदा काय म्हणाल्या?
याबाबत जया प्रदा म्हणाल्या की, जया बच्चन यांनी जे विधान केले ते योग्य नाही. त्यांनी स्वत:च्या घरातूनच याविरोधात आवाज उचलत मी युवकांना सांभाळेन म्हटलं पाहिजे. बच्चन कुटुंब जे बोलतं ते जग ऐकण्यासाठी तयार असतं. त्यामुळे माझं बच्चन कुटुंबाला आव्हान आहे तुम्ही या ड्रग्स माफिया आणि ड्रग्स एडिक्टेंड युवकांना सांभाळू शकता का? ड्रग्स प्रकरणावरुन जया बच्चन राजकारण करत आहे असाही आरोप त्यांनी केला.
तसेच जया बच्चन यांच्या भावनांचा सन्मान करते, परंतु त्यांच्या भावनांमध्ये फक्त राजकारण दिसते. कारण अमर सिंह यांनी बच्चन कुटुंबीयांना संकटकाळी मदत केली होती. परंतु जेव्हा अमर सिंह जीवन आणि मृत्युच्या दारात संघर्ष करत होते तेव्हा जया बच्चन यांच्या भावना त्यावेळी दिसल्या नाहीत अशा शब्दात जया प्रदा यांनी बच्चन कुटुंबीयांवर आरोप केला आहे.
बॉलीवूडमध्ये अमली पदार्थ आणि शय्यासोबतही!, कंगनाने केला नवा आरोप
जया बच्चन- कंगना वादात अमिताभ बच्चन यांची एन्ट्री, ट्रोलर्सला लगावला जोरदार टोला
उर्मिला मातोंडकर कंगणावर बरसली, नुसती घाण परवण्याची काय गरज आहे