तापसी पन्नू सध्या न्यूयॉर्कमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे आणि तिने तिच्या ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत. तापसीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत आणि त्याबद्दल चर्चाही सुरू आहे. तापसीने पांढऱ्या क्रॉप टॉप आणि स्नीकर्ससह साडी नेसलेली दिसतेय. तापसी बॉयफ्रेंड मॅथिआस बोई आणि बहीण शगुन पन्नूसोबत व्हॅकेशनवर गेली आहे.
तापसी पन्नू ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तापसी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडे तापसी तिचा बॉयफ्रेंड मॅथिआस बोई आणि बहीण शगुन पन्नूसोबत न्यूयॉर्कच्या सुट्टीवर आहे आणि यादरम्यान तापसी साडीत दिसली. तापसीने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तापसीने जांभळ्या रंगाच्या साडीवर क्रॉप टॉप घातला होता आणि स्नीकर्सही घातले होते. तापसीचा बॉयफ्रेंड मॅथिआस बोई हा एक बॅडमिंटनपटू आहे.
त्यांच्या नात्याबद्दल तापसीने कबुली देखील दिली आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली होती कि, 'मी त्याला खूप दिवसांपासून डेट करत आहे. मी कधीच त्यापासून दूर गेले असं झालं नाही.'
एका मुलाखतीत तापसीला अलीकडेच लग्नबंधनात अडकलेल्या बॉलिवूड कलाकारांबद्दल विचारण्यात आले. तिचं काही असं प्लॉनिंग आहे का? तापसीने सांगितले की, ''आम्ही दोघेही आमच्या करिअरच्या दृष्टीने स्वावलंबी व्यक्ती आहोत आणि काम आम्हाला व्यस्त ठेवते. नशीब की आम्ही एकमेकांसाठी वेळ काढतो. माझी कोणासोबत स्पर्धा सुरु नाहीय. ना तर व्यावसायिक किंवा वैयक्तिकरित्या, मी माझ्या आयुष्यात ज्या वेगाने पुढे जात आहे तो माझ्यासाठी सर्वोत्तम आहे.''