दगडफेकीमुळे गंभीर जखमी झालेल्या थिरूमनी यांना तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात असून, दगडफेक करणाºयांचा कठोर शब्दात निषेध केला जात आहे. या घटनेनंतर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी पीडिताच्या कुटुंबीयांना रुग्णालयातच भेट दिली.}}}} ">Uncouths. Janglis. #StonePelters#Srinagarhttps://t.co/R9EEu4Qjal— Koena Mitra (@koenamitra) May 7, 2018
काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांवर संतापली ‘ही’ अभिनेत्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2018 2:33 PM
जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाºयांवर नियंत्रण आणणे अजूनही शक्य झाले नसल्याने त्यांच्या या कृत्याला निष्पाप बळी पडताना दिसत आहेत. असाच एक ...
जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाºयांवर नियंत्रण आणणे अजूनही शक्य झाले नसल्याने त्यांच्या या कृत्याला निष्पाप बळी पडताना दिसत आहेत. असाच एक प्रकार समोर आला असून, दगडफेक करणाºयांमुळे एक पर्यटकाचा हकनाक बळी गेला आहे. पर्यटकाच्या मृत्यूमुळे राजकारण्यांसह कलाकारांकडूनही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. आता यामध्ये अभिनेत्री कोएना मित्रा हिचेही नाव जोडले गेले असून, तिने या घटनेवर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. कोएनाने ट्विटच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त करताना दगडफेक करणाºयांना अशिक्षित आणि जंगली असे म्हटले आहे. दरम्यान, गेल्या सोमवारी दगडफेक करणाºयांच्या तावडीत सापडलेल्या एका पर्यटकाचा हकनाक बळी गेला. चेन्नई येथील थिरूमनी (२२) आपल्या परिवारासह गुलमर्ग येथे फिरण्यासाठी गेले होते. मात्र थिरूमनी गुलमर्ग परिसरात दगडफेक करणाºयांच्या तावडीत सापडले होते.