Join us

'पद्मावत'साठी दीपिका पादुकोण नाही तर 'ही' अभिनेत्री होती पहिली चॉईस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2018 10:52 AM

संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा हा 2018 मधला सर्वात हिट सिनेमांपैकी एक ठरला. हा सिनेमा दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या करिअरमधला टर्निंग पाईंट ठरला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

ठळक मुद्देनुकताच ऐशचा फन्ने खां सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहेयात तिने  एका गायिकेची भूमिका साकारत आहे

संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा हा 2018 मधला सर्वात हिट सिनेमांपैकी एक ठरला. हा सिनेमा दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या करिअरमधला टर्निंग पाईंट ठरला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का संजय लीला भन्साळी यांची पद्मावतसाठी दीपिका पादुकोण नाही तर ऐश्वर्या राय बच्चन होती पहिली पसंद होती. मात्र त्याच्या तोडीचा खिल्लजी मिळाला नाही म्हणून त्यांनी ऐश्वर्याला कास्ट केले नाही. याआधी ऐश्व आणि संजय लीला भन्सांळी यांच्या जोडीने 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास' आणि 'गुजारिश' सारखे हिट सिनेमा दिले आहेत. ऐश्वर्या रायने एका इंटरव्हु दरम्यान याचा खुलासा केला आहे.   

 स्पॉटबॉयला दिलेल्या इंटरव्हु दरम्यान ऐशला विचारण्यात आले होते की, तिला संजय लीला भन्सांळीसोबत पुन्हा काम करायला आवडले का?, यावर ती म्हणाली होती की, आम्ही बाजीराव मस्तानी पण करणार होतो मात्र बाजीराव नाही मिळाला त्यानंतर आम्हाला बाजीराव नाही मिळाला. संजय लीला भन्सांळी यांना मला पद्मावतमध्ये घ्यायचे होते मात्र कास्टिंग दरम्यान खिल्लजी नाही मिळाला. त्यामुळे मला या सिनेमात ते घेऊ शकले नाही. मला त्यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करायला आवडले. शेवटी संजय लीला भन्सांळी यांनी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांची निवड केली.  

  नुकताच ऐशचा फन्ने खां सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात तिने  एका गायिकेची भूमिका साकारत आहे. आॅस्कर नामांकित ‘एव्रीबडीस फेमस’ या डच चित्रपटाचा ‘फन्ने खां’ हा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अतुल मांजरेकर करीत आहेत, तर ऐशसह चित्रपटात अनिल कपूर, राजकुमार रावची महत्त्वाची भूमिका आहे. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन