Join us

OMG! अदा शर्माने चक्क साडी नेसून केला जबरदस्त स्टंट, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 11:08 AM

आली लहर केला कहर..!

ठळक मुद्देअदाने बॉलिवूडमध्ये 2008 साली आलेल्या ‘1920’ या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री घेतली.

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तिने आपल्या खास अदांनी प्रेक्षकांची मने जिंकलीत. आम्ही बोलतोय अभिनेत्री अदा शर्मा बद्दल. ‘कमांडो 3’ या सिनेमात अदा जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसली होती. सध्या याच अदाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. होय, समुद्र किना-यावर चक्क साडी नेसून कार्टव्हिल करतानाच्या अदाच्या या व्हिडीओने चाहत्यांना वेड लावले आहे.

अदाने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आणि बघता बघता तो व्हायरल झाला. साडी नेसून कार्टव्हिल करणे सर्वांचे काम नाही. अदाने मात्र अगदी सहजरित्या हे केले. चक्क साडी नेसून अदाला कार्टव्हिल करताना पाहून सगळेच थक्क झालेत.  अदा शर्मा सोशल मीडियाच्या माध्यमातून  ती नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. स्वत:चे रोज नवे हॉट फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते. या फोटोंवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

अदाने बॉलिवूडमध्ये 2008 साली आलेल्या ‘1920’ या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री घेतली. यानंतर ‘हम है राही यार के’ आणि ‘हंसी तो फंसी’ या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या.‘कमांडो 3’या सिनेमातही अदा झळकली होती. यात विद्युत जामवाल मुख्य भूमिकेत होता. याशिवाय अंगीर धर आणि गुलशन देवैया यासारखे कलाकार स्क्रीन शेअर करताना दिसले होते.दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जरी अदा काम करत असली तरी तिचा जन्म मुंबईत झाला आहे. तिला हिंदी, इंग्लिश आणि तमीळ भाषेचे चांगले ज्ञान आहे.  

यावेळी अदाच्या अदा नाही तर मास्कमुळे होते ती ट्रेंड, पाहून तुम्हीही व्हाल थक्क

टॅग्स :अदा शर्मा