Join us  

सुशांत आणि अदा दोघेही भाडेकरू, मग अभिनेत्यानं आत्महत्या केलेलं 'ते' घर कुणाच्या मालकीचं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 9:44 AM

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केलेल्या 'त्या' घरी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री राहायला गेली आहे.

'बस्तर', 'द केरळ स्टोरी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) तिच्या नव्या घरामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपुर्वी अदा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) राहायचा त्या वांद्रे येथील घरी राहायला गेली आहे. हे तेच घर आहे, जिथे सुशांतने आत्महत्या केली होती. पण, हे घर तिने विकत घेतले आहे की तिथे ती भाडेकरु म्हणून राहात आहे, याबाबत तिने खुलासा केला आहे. 

नुकतंच अदा मुंबईत स्पॉट झाली. यादरम्यान पापाराझींशी बोलताना ती आणि सुशांत दोघेही भाडेकरी असून ते घर श्री लालवानी यांचं असल्याचं अदानं सांगितलं. पापाराझींनी तिला विचारलं की, "तू सुशांतचं घर भाड्याने घेतले आहेस की विकत घेतले आहेस?" या प्रश्नावर उत्तर देत अदा शर्मा म्हणाली, "मी ते भाड्याने घेतले आहे, विकत घेतलेले नाही. 'द केरला स्टोरी' सिनेमाची 300 कोटींची कमाई माझी एकटीची नाही. मी भाडेकरु म्हणून राहत आहे, पण ते श्री लालवानी यांचे घर आहे. सुशांतही  (Sushant Singh Rajput Bandra house) तिथे भाड्यानेच राहत होता". 

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील मॉन्ट ब्लँक बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर असलेला त्याचा अपार्टमेंट रिकामा होता. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर या फ्लॅटमध्ये कुणीही राहण्यासाठी तयार होत नव्हतं.  मात्र, चार वर्षांनंतर अदा शर्माच्या तिथे शिफ्ट झाली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या घरात अदा ही तिच्या आजीबरोबर राहत आहे.  हा एक डुप्लेक्स फ्लॅट आहे, जो ३६०० चौरस फूट इतका आहे. खालच्या मजल्यावर एक मोठा हॉल आहे आणि वरच्या मजल्यावर तीन बेडरूम आहेत.

अदाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2008 मध्‍ये रिलीज झालेल्या विक्रम भट्टच्‍या 1920 या  हॉरर  चित्रपटामधून अदानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अदानं कमांडो 2, कमांडो 3 आणि बायपास रोडसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटामधील अदाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.आता अदाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

टॅग्स :अदा शर्मासुशांत सिंग रजपूतसेलिब्रिटीबॉलिवूडमुंबईसुंदर गृहनियोजन