Join us

Adah Sharma : अदा शर्माला सलग 48 दिवस सुरू होती मासिक पाळी, अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 12:06 PM

बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे गंभीर आजाराचा सामना करावा लागल्याचं अदा शर्मानं सांगितलं.

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने (Adah Sharma) एंडोमेट्रिओसिस नावाचा गंभीर आजार झाल्याची माहिती दिली. ही एक गंभीर समस्या आहे. याबाबत अदा शर्माने स्वत: एका मुलाखतीमध्ये माहिती दिली आहे. 'बस्तर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अदा शर्माला 48 दिवस सलग रक्तस्त्राव सुरू होता.  बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे गंभीर आजाराचा सामना करावा लागल्याचं अदा शर्मानं सांगितलं. 

नुकताच हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने स्वतःच्या आजाराबद्दल मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली, ' सिनेमातील भूमिकांसाठी मला बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची गरज होती. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात मला सडपातळ व्हायच होतं. कारण, एका कॉलेज मुलीप्रमाणे मला दिसायचं होतं. तर 'कमोंडो'साठी मी बलवान असणं गरजेचं होतं. तर 'बस्तर'सिनेमातील अ‍ॅक्शन सिन्ससाठी मजबूत असणं गरजेचं होतं'.

पुढे ती म्हणाली, 'बस्तर'साठी स्वतःचं मोठ्या प्रमाणात वजन वाढवावं लागलं. वजन वाढवण्यासाठी एका दिवसात मी जवळपास 10 ते 12 केळी खाल्ली होती. वजन वाढत होतं, पण त्यासोबत अनेक समस्या देखील समोर येत होत्या.  शूटिंगदरम्यान आठ किलोच्या खऱ्या बंदुकांचा वापर करावा लागायचा. शूटिंगदरम्यान मला पाठिचं दुखणं सुरू झालं. तसेच एंडोमेट्रिओसिस आजार झाला.  या आजारात मासिक पाळी थांबत नाही. मला सलग 48 दिवस रक्तस्त्राव होत राहिला'.

एंडोमेट्रिओसिस ही महिलांमध्ये गर्भाशयाशी संबंधित समस्या आहे.  भारतात  सर्वाधिक महिलांना हा आजार उद्भवतो. एंडोमेट्रिओसिसला सोप्या शब्दात सांगायचे झाले तर गर्भाशयाच्या लायनिंगला एंडोमेट्रियम असं म्हणतात. जेव्हा ओव्हरी,बाऊल किंवा पेल्विसच्या लायनिंगवर टिश्यू विकसित  होऊ लागतात तेव्हा एंडोमेट्रोयोसिसची समस्या उद्भवते. त्यामुळे महिलांना तीव्र वेदना होतात. विशेषत: जेव्हा त्यांचे मासिक चक्र येते तेव्हा वेदना आणखी वाढते.

टॅग्स :अदा शर्मासेलिब्रिटीबॉलिवूडआरोग्य