Join us

अदा शर्मा बनणार 'सुपरवुमन', आंतरराष्ट्रीय सिनेमाची ऑफर; 'द केरळ स्टोरी' नंतर नशीबच पालटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 13:19 IST

अदा शर्मा लवकरच इंटरनॅशनल प्रोडक्शनमध्ये काम सुरु करेल हे तिने कन्फर्म केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma)  'द केरळ स्टोरी' सिनेमामुळे प्रकाशझोतात आली. या सिनेमानंतर तिचं नशीबच उजळलं आहे. अदाला एका आंतरराष्ट्रीय सिनेमात 'सुपरवुमन'ची भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. लवकरच ती या सिनेमाचं शूट सुरु करणार आहे. तसंच ती यासाठी खूप उत्सुक असल्याचं दिसतंय.

अदा शर्मा लवकरच इंटरनॅशनल प्रोडक्शनमध्ये काम सुरु करेल हे तिने कन्फर्म केले आहे. मात्र हा प्रोजेक्ट नेमका काय असणार आहे याबद्दल तिने अद्याप अधिक डिटेल्स दिलेले नाही. अदा म्हणाली,'मला सुपरवुमनची भूमिका नेहमीच कूल वाटली आहे. मी आत्ता फक्त इतकंच सांगू शकते की यामध्ये भूमिका साकारणार आहे. या प्रोजेक्टबद्दल अधिक माहिती शेअर करण्यासाठी मी अजून वाट पाहू शकत नाही. अॅक्शन हा असा जॉनर आहे ज्यामध्ये सहभाग घेऊन मला नक्कीच मजा येते.'

ती पुढे म्हणाली,'मला वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका करायला आवडतात. मी नशीबवान आहे की मला आता अशा भूमिका ऑफर होत आहेत. 'द केरळ स्टोरी'नंतर मी विचार केला की हे फार वेगळं असेल. मला सिनेमाचं ट्रेलर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यावर बोलायला आवडत नाही कारण मी त्याबाबतीत अंधविश्वासू आहे.'

अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी'ने बॉक्सऑफिसवर 238 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. सुदिप्तो सेन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं तर विपुल शहा यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

टॅग्स :अदा शर्माबॉलिवूडआंतरराष्ट्रीय