अभिनेत्री अदा शर्मा सध्या तिच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. वादांनी वेढलेल्याा या चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुकही होत आहे. पण अदाचा इथंवरचा प्रवास सोपा नव्हता. करिअरच्या सुरुवातील तिला अनेक नकार पचवावे लागले. अदाला नकार देताना तिला सल्ला ही दिला गेला होता, ज्याचा खुलासा अभिनेत्रीने आता केला.
अदा शर्माने तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले, 'लोकांनी मला नाकाची सर्जरी करून घेण्याचा सल्ला दिला होता. आता चित्रपट केल्यानंतर सर्वांना माझे नाक आवडायला लागले.' असं अदा म्हणाली दरम्यान, 'द केरळ स्टोरी'द्वारे बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिक कमाई केल्याबद्दल आदाने आनंद व्यक्त केला.
अदा २००८ साली विक्रम भट्ट यांच्या '1920' या सिनेमातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ती काही मोजक्या सिनेमांमध्ये झळकली. परंतु, तिला खरी ओळख द केरळ स्टोरीमुळे मिळतीये असं म्हणायला हरकत नाही. हिंदी सह अदाने तेलुगू आणि तामिळ सिनेमांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे साऊथमध्येही तिची क्रेझ आहे. अदाने केवळ १२ वी पर्यंत तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर ती अभिनय क्षेत्रात आली. अदा १० वीत असतानाच तिने अभिनेत्री होण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार, तिने या क्षेत्रात पदार्पणही केलं.