Join us

पाचशे लोकांमधून निवडण्यात आली अक्षयकुमार-राधिका आपटेची शेजारीन!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 11:54 AM

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटात भोपाळच्या संगीता श्रीवास्तव राधाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटात ...

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटात भोपाळच्या संगीता श्रीवास्तव राधाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटात त्या अक्षय आणि राधिकाच्या शेजाºयाची भूमिका करीत आहेत. या चित्रपटाविषयी संगीताने एक वेबसाइटशी संवाद साधला असता चित्रपटासंबंधी अनेक किस्से सांगितले. त्यांनी सांगितले की, चित्रपटाची शूटिंग मध्य प्रदेशातील महेश्वर आणि त्याच्या परिसरात करण्यात आली. जवळपास दीड महिन्यांपर्यंत चित्रपटातील बराचसा भाग याठिकाणी शूट करण्यात आला. चित्रपटात भूमिका मिळावी म्हणून मी भोपाळ येथे झालेल्या आॅडिशनसाठी पोहोचले होते. याठिकाणी जवळपास ५०० पेक्षा अधिक लोक आले होते. तीन दिवस चाललेल्या या आॅडिशनमधून जेव्हा माझी निवड झाली तेव्हा विश्वासच बसला नाही.’ पुढे बोलताना संगीताने सांगितले की, जेव्हा मी महेश्वर याठिकाणी शूटिंगसाठी पोहोचली अन् अक्षयला पहिल्यांदा भेटली तेव्हा खूपच चांगले वाटले. अक्षय त्याचा शॉट दिल्यानंतरही सेटवर सक्रिय असायचा. इतरांना तो प्रोत्साहन द्यायचा. वास्तविक तो खूपच कॉमेडी व्यक्ती आहे. मात्र कामात त्याला हे अजिबातच आवडत नाही. सेटवर दररोज आठ ते दहा तास शूटिंगचे शेड्यूल असायचे. एका सीनबाबत बोलताना संगीताने सांगितले की, आम्ही होळीच्या दिवशी दिवाळीचा सीक्वेंस शूट केला होता. तो माझ्यासाठी खूपच रोमांचक अनुभव होता. आम्हाला स्पष्ट शब्दात ताकीद दिली होती की, दिवाळीचा सीक्वेंस असल्याने होळीच्या दिवशी कोणाशीही रंग खेळणार नाही. त्यामुळे अनेकांना हा सीन करणे आव्हानात्मक होते.हा चित्रपट अशा विषयावर आधारित आहे, ज्यावर मोकळेपणाने बोलणे टाळले जाते. अशात चित्रपटात काम करण्यावरून कुटुंबातील लोकांनी कसे रिअ‍ॅक्ट केले या प्रश्नाचे उत्तर देताना संगीताने सांगितले की, मला अभिमान वाटतो की, मी या चित्रपटाचा भाग बनू शकले. मासिक पाळीला एका टॅबूसारखे बघितले जाते, जे पूर्णत: चुकीचे आहे. जेव्हा मला या चित्रपटासाठी भूमिका मिळाली तेव्हा परिवारातील लोकांनी मला प्रचंड सपोर्ट केला. त्यांनी कधीही मला विरोध केला नाही. मला अक्षय आणि राधिकासोबत काम करणे खूपच चांगले वाटले. अपेक्षा करते की, हा प्रवास पुढेही सुरू राहील.