Join us

फरहान अख्तरचं लग्न अन् एक्स वाइफ अधुनाच्या डोक्याला ताप, ट्रोलिंगमुळे झाली बेजार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 6:12 PM

Farhan Akhtar-Shibani Dandekar Wedding सततच्या ट्रोलिंगमुळे अधुना (Adhuna Bhabani) इतकी वैतागली की, सोशल मीडियावर तिनं तिच्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने (Farhan Akhtar ) नुकतीच शिबानी दांडेकरसोबत (Shibani Dandekar) लग्नगाठ बांधली. या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 19 तारखेला हा विवाह सोहळा पार पडला आणि फरहान-शिबानीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. याचदरम्यान काही लोकांनी फरहानची एक्स वाईफ अधुना भबानी (Adhuna Bhabani) हिला ट्रोल करायला सुरूवात केली. सततच्या ट्रोलिंगमुळे अधुना इतकी वैतागली की, सोशल मीडियावर तिनं तिच्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

अधुनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सवर जोरदार पलटवार केला. ज्यांच्याकडे पॉझिटीव्ह काहीही नाही, अशांना थेट ब्लॉक करतेय, असं तिने ट्रोलर्सला सुनावलं. अधुनाच्या या पोस्टला प्रीति झिंटा व मनीषा कोईराला सपोर्ट करताना दिसल्या.

पहिली भेट आणि घटस्फोट

अधुनाचा जन्म लंडनमध्ये झाला आहे. फरहानपेक्षा ती सहा वर्षांने मोठी आहे. अधुना बी ब्ंलंट नावाने सलूनची फ्रँचायजी चालवते. फरहान आणि अधुनाची पहिली भेट 1997 मध्ये झाली होती. जुहूच्या एका नाइट क्लबमध्ये दोघे भेटले होते. त्यावेळी फरहान ‘दिल चाहता हैं’ सिनेमात  करत होता. फरहान आणि अधुनाची पहिली भेट फारच लहान होती.  त्यानंतर फरहानची बहिण झोयाने अधुनाला भेटायला बोलवलं होतं.फरहान ‘दिल चाहता हंै’चा दिग्दर्शक होता. तर अधुना हअरस्टायलिस्ट होती. याच चित्रपटाच्या सेटवर आधी दोघांची मैत्री झाली आणि नंतर दोघंही प्रेमात पडले.

अखेर तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर 2000 साली हे जोडपं लग्नबंधनात अडकलं.  2016 साली दोघांनीही एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याला शाक्या आणि अकिरा नावाच्या मुली आहेत. अधुनाला घटस्फोट दिल्यानंतर फरहानच्या आयुष्यात शिबानीची एन्ट्री झाली. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्या 19 तारखेला फरहान व शिबानी यांनी लग्न केलं. या लग्नात फरहानच्या मुली शाक्या व अकिरा या दोघीही सहभागी झाल्या होत्या. फरहान व अधुना यांचा घटस्फोट झाला आहे. पण दोघं आजही चांगले मित्र आहेत. दोघंही अनेकदा एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट्स करताना दिसतात.

टॅग्स :फरहान अख्तरशिबानी दांडेकर