Join us

जसा विचार केला तसा तो नव्हताच...! अध्ययन सुमन व मायरा मिश्राचे ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 2:06 PM

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दोघे एकमेकांपासून विभक्त झालेत. खुद्द मायराने हा खुलासा केला.

ठळक मुद्देया ब्रेकअपनंतर प्रेमावरचा विश्वास उडाला का? असे विचारले असता ती म्हणाली, माझा अजूनही प्रेमावर विश्वास आहे. पण कोणत्याही व्यक्तिच्या प्रेमात पडण्याआधी त्याला जाणून घ्यायला आता मला आवडेल.

शेखर सुमन याचा मुलगा अध्ययन सुमन याचे आणखी एक रिलेशनशिप अपयशी ठरले. होय, अध्ययन सुमन गेल्या दोन वर्षांपासून मायरा मिश्रासोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण आता दोघांचे ब्रेकअप झालेय. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मायराने या नात्याची कबुली दिली होती. अध्ययन सुमनसोबत नात्यात असल्याचे तिने जगजाहिर केले होते. यानंतर दोघेही लिव्ह इनमध्ये राहत होते.ऐकून आश्चर्य वाटेल पण लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर महिनाभरातच दोघांचे ब्रेकअप झाले. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दोघे एकमेकांपासून विभक्त झालेत. बॉम्बे टाईम्सशी बोलताना खुद्द मायराने हा खुलासा केला.

ती म्हणाली, ‘होय, नोव्हेंबरमध्येच आमचे ब्रेकअप झालेय. अध्ययन त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर ब्रेकअप स्टोरी शेअर करतोय. पण मी स्पष्ट करू इच्छिते की, त्या ब्रेकअप पोस्ट माझ्यासाठी नव्हत्या. त्या त्याच्या सॉन्ग प्रमोशनसाठी होत्या. या नात्यात मी खूप गंभीर होते. हे नाते शेवटपर्यंत टिकेन, असे मला वाटत होते. पण असे काहीही झाले नाही. अपेक्षेप्रमाणे आमचे नाते पुढे चालू शकले नाही.   ज्या अध्ययनच्या मी प्रेमात पडले होते, तो एकदम वेगळा होता. पण त्याच्यासोबत राहायला लागल्यावर तो अचानक वेगळा भासायला लागला. मी जसा विचार केला होता, तसा तो नव्हताच. आमच्यात खूप मोठी कम्युनिकेशन गॅप होती. दोन महिने आम्ही एकमेकांशी बोललोही नव्हतो. कारण मी माझ्या टीव्ही शोमध्ये बिझी होते आणि तो त्याच्या शूटमध्ये.’

या ब्रेकअपनंतर प्रेमावरचा विश्वास उडाला का? असे विचारले असता ती म्हणाली, माझा अजूनही प्रेमावर विश्वास आहे. पण कोणत्याही व्यक्तिच्या प्रेमात पडण्याआधी त्याला जाणून घ्यायला आता मला आवडेल. यानंतर इंडस्ट्रीतल्या कोणत्याही पुरूषाच्या प्रेमात पडण्याची माझी इच्छा नाही.या ब्रेकअपच्या वृत्तावर अध्ययन सुमनची प्रतिक्रिया मात्र मिळू शकली नाही.

टॅग्स :अध्ययन सुमनशेखर सुमन