कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद आता विकोपाला पोहोचला. बुधवारी बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर हातोडा चालवला. यानंतर कंगना शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. अशात ठाकरे सरकारशी पंगा घेणा-या कंगनाच्या अडचणीही वाढताना दिसत आहेत. आता राज्य सरकारने कंगनाच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशीची तयारी सुरु केली आहे. अभिनेता शेखर सुमन याचा मुलगा अध्ययन सुमन याच्या एका जुन्या मुलाखतीच्या व्हिडीओला आधार मानून ही चौकशी होणार असल्याचे समजतेय. मात्र आता यात एक ट्विट आला आहे. खुद्द अध्ययन सुमनने कंगनाच्या या प्रकरणात मला गोवू नका, अशी हात जोडून विनंती केली आहे.कंगना राणौत प्रकरणात नाव येताच अध्ययनने एक व्हिडीओ शेअर केला केला. ‘कालपासून खूप डिस्टर्ब आहे. कारण एका जुन्या मुलाखतीच्या आधारावर माझे नाव गोवले जातेय. मी ही मुलाखत 2016 मध्ये दिली होती. मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की, प्लीज मला यात गोवू नका,’ असे अध्ययनने या मुलाखतीत म्हटले आहे.
कंगनाशी माझा काहीही संबंध नाही...मला जे काही बोलायचे होते, ते मी 2016 मध्ये बोललो होतो. तेव्हा मी आणि माझ्या कुटुंबाला नॅशनल टेलिव्हिजनवर लक्ष्य केले गेले होते. मी खूप मनस्ताप सहन केलाय. 11-12 वर्षांच्या या सर्व मनस्तापानंतर मला आता पुढे जायचे आहे. कंगनासोबत माझा काहीही संबंध नाही व पुढेही नसणार. पण आमचा लढा एक आहे, तो म्हणजे जस्टिस फॉर सुशांत, असेही अध्ययनने त्याच्या व्हिडीओत म्हटले आहे.
“बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेना आता 'सोनिया सेना' बनलीय”; कंगनानं पुन्हा डिवचलं
कंगनावर केले होते अनेक आरोपकंगना व अध्ययन सुमन कधीकाळी रिलेशनशिपमध्ये होते. पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले होते. यानंतर 2016 मध्ये अध्ययन सुमनने डीएनएला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने कंगनावर गंभीर आरोप केले होते. रिलेशनशिपदरम्यान कंगनाने माझा अतोनात शारीरिक व मानसिक छळ केला होता. ती मला मारायची, शिव्या द्यायची़ एकदा तिने मला सँडलही फेकून मारली होती, असे अध्ययन या मुलाखतीत म्हणाला होता.
कोकेनवरून झाले होते भांडण2008च्या मार्चमध्ये द लीला या हॉटेलात कंगनााने बर्थ डे पार्टी ठेवली होती. या पार्टीत तिने सर्व मित्रांना बोलवले होते. चल आज रात्री कोकेन घेऊ, असे ती मला म्हणाली होती. त्याआधी मी तिच्यासोबत काहीवेळा हॅश घेतले होते. मात्र मला ते फारसे आवडले नव्हते. मी तिच्यासोबत कोकेन घेण्यास नकार दिला होता. मला आठवते, त्या रात्री यावरून तिचे व माझे जोरदार भांडण झाले होते, असा खुलासाही अध्ययनने या मुलाखतीत केला होता.
चौकशीचे आदेशशिवसेना नेते सुनील प्रभम आणि प्रताप सरनाईक यांनी अध्ययन सुमनच्या या जुन्या मुलाखतीची कॉपी महाराष्ट्र सरकारला सोपवली आहे. यानंतर सरकारने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.