प्रभास (Prabhas) आणि क्रिती सनॉन(Kriti Sanon)चा 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट २०२३ चा बहुप्रतीक्षित चित्रपट होता. रामायणावर आधारित हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अखेर 'आदिपुरुष' १६ जूनला थिएटरमध्ये दाखल झाला आणि पहिल्याच दिवशी त्याने रेकॉर्डही तोडले. एका दमदार सुरुवातीच्या वीकेंडनंतर, चित्रपट त्याच्या खराब संवाद, व्हीएफएक्स आणि पात्रांमुळे वादात सापडला. संतप्त लोकांनी हा चित्रपट पूर्णपणे नाकारला असून त्यावर बंदी घालण्याची मागणीही जोरात सुरू आहे. त्याच वेळी, या सर्व वादांचा 'आदिपुरुष'च्या कमाईवर वाईट परिणाम झाला आहे आणि आता त्याच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे.
रिलीज झाल्यापासून 'आदिपुरुष' वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाच्या निर्मात्यांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. वाढता वाद पाहता निर्मात्यांनी चित्रपटाचे संवाद बदलले, थ्रीडी तिकिटांच्या किमतीही कमी केल्या, असे असतानाही 'आदिपुरुष'ला थंड प्रतिसाद मिळतो आहे आणि दिवसेंदिवस त्याच्या कमाईत मोठी घसरण होत आहे. दरम्यान चित्रपटाच्या अकराव्या दिवसाच्या म्हणजेच दुसऱ्या सोमवारच्या कमाईचे प्रारंभिक आकडेही आले आहेत, जे हैराण करणारे आहेत.
एकूण कलेक्शन २७७.७५ कोटी रुपयेSacNilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'आदिपुरुष' ने रिलीजच्या अकराव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या सोमवारी अंदाजे २ कोटींची कमाई केली आहे. यानंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता २७७.७५ कोटी रुपये झाले आहेत.
'आदिपुरुष'च्या कमाईत घट'आदिपुरुष'च्या कमाईत दररोज मोठी घट होत आहे. रिलीजच्या ११व्या दिवशी त्याने आतापर्यंतचे सर्वात कमी कलेक्शन केले आहे. अशा परिस्थितीत आदिपुरुष बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फेल ठरला आहे. हा चित्रपट ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणेही कठीण जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ६०० कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनलेल्या 'आदिपुरुष'ला त्याची किंमतही काढता आलेली नाही.