Adipurush Dialogue: ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपट रिलीज होताच वादात सापडला. प्रेक्षकांना चित्रपटाचे फक्त VFX आवडले नाहीत, तर चित्रपटातील संवादांवरही लोकांनी आक्षेप घेतला. चित्रपटातील पौराणिक पात्रांच्या तोंडी अतिशय बाईट भाषा दिल्याचा आरोप होत आहे. या सर्व गोंधळादरम्यान, निर्मात्यांनी चित्रपटातील संवाद बदलले आहेत.
चित्रपट रिलीज झाल्याच्या दोन दिवसानंतर लेखक मनोज मुंतशिर यांनी वाढता वाद पाहता, चित्रपटातील संवाद बदलणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे आता चित्रपटातील वादग्रस्त संवाद बदलण्यात आले आहेत. आधी चित्रपटात “कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, जलेगी भी तेरे बाप की,” हा संवाद होता. या संवादावरुनच गोंधळ उडाला होता. पण, आता हा संवाद बदलण्यात आला आहे.
आदिपुरुषाचा नवा संवाद
सध्या सोशल मीडियावर चित्रपटातील एक सीन व्हायरल होतोय, ज्यामध्ये हनुमानाची भूमिका साकारणारा देवदत्त नागे बदललेले डायलॉग बोलताना दिसत आहेत. ज्या संवादात पूर्वी 'बाप' हा शब्द होता, आता तिथे 'लंका' हा शब्द वापरला गेला आहे. आता देवदत्त नागे म्हणतो, ‘कपडा तेरी लंका का, तेल तेरी लंका का, आग भी तेरी लंका की और जलेगी भी तेरी लंका ही...’
दरम्यान, चित्रपटात आणखी काही संवाद आहेत, ज्यावरही लोकांनी आक्षेप घेतला आहे. जसे- 'तेरी बुआ का बगीचा है क्या, जो हवा खाने चला आया', 'जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे, उनकी लंका लगा देंगे.' आता या संवादांमध्येही काही बदल होतो, का हे पाहावे लागेल.
आदिपुरुष 400 कोटींच्या जवळ...
चित्रपटात प्रभासने श्रीरामाची भूमिका साकारली आहे, तर क्रिती सेनन माता सीनेच्या, सैफ अली खान रावणाच्या आणि देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांत चांगली कामगिरी केली, मात्र आता बॉक्स ऑफिसवर चित्रपट थोडासा सुस्त झालेला पाहाला मिळत आहे. पाच दिवसांत या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर सूमारे 400 कोटींचा गल्ला जमवला आहे.