सध्या देशात कोणता वादाचा मुद्दा आहे तर तो 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमा. टीझर आल्यापासूनच हा सिनेमा वादात सापडला आहे. रामायणाची मोडतोड करुन सिनेमा दाखवण्यात आला असून हनुमानाच्या तोंडी वाईट भाषा दाखवल्यामुळे प्रेक्षक भडकले आहेत. देशाच्या अनेक ठिकाणी या सिनेमाच्या विरोधात प्रेक्षक आक्रमक झालेत. ऐवढचं नाही तर या सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना ही सर्वांनी घेरलंय. यानंतर मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी संवाद बदलण्यात येतील असं जाहीर केलं. याचा दरम्यान असा खुलासा होतोय की आदिपुरुषमध्ये रामाची भूमिका साकारण्यासाठी प्रभास तयार नव्हता.
'बाहुबली' फेम प्रभासही 'राम'च्या भूमिकेत प्रेक्षकांना भावला नाही. सिनेमाच्या सुरुवातील प्रभास स्वत: ही भूमिका साकारण्यासाठी तयार नव्हता. पण नंतर ओम राऊतने त्याला तयार केलं. हा खुलासा खुद्द दिग्दर्शकाने स्वत:च केला आहे.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ओम राऊतने सांगितले, प्रभासला या भूमिकेसाठी तयार करणं खरचं सोप नव्हत. आमचं महामारी दरम्यान फोनवर बोलणं झालं होतं. यादरम्यान प्रभासने मला विचारलं होते की, तुला असं का वाटतं की ही भूमिका मी साकारावी?, मग मी म्हणालो, मला असं वाटतं की प्रभू श्री रामांची भूमिका तू साकारावी. तो म्हणाला नक्की?, मी म्हणाला हो. पण मग तो विचार करू लागला की हे कसं होणार? झूम कॉलवर एवढ्या मोठ्या स्टारला चित्रपट सांगणे अशक्य होते, म्हणून मी त्याच दिवशी पायलटची व्यवस्था केली आणि मुंबईहून हैदराबादला गेलो. मी हैदराबादला गेलो आणि त्याला चित्रपटाची कथा सांगितली तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला.
सिनेमातील संवाद असो, व्हीएफएक्स असो किंवा अगदी कलाकारांची निवड सगळंच गंडलं असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत.