Join us

Adipurush: हनुमानच्या वादग्रस्त संवादावर लेखकाने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले- ते जाणीवपूर्वक लिहिले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 10:04 AM

हनुमानच्या डायलॉगवरुन सुरु झालेल्या या वादावर लेखक मनोज मुंतशीर यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

 'आदिपुरुष'(Adipurush) चित्रपट रिलीज होताच वादाच्या भवऱ्यात अडकला आहे. काल १६ जूनला चित्रपट रिलीज होताच विरोधही सुरू झाला आहे. आदिपुरुषमधील हनुमानच्या तोंडी असलेले डायलॉग ऐकून सोशल मीडियावर खूप गदारोळ झाला. संतापलेल्या नेटकऱ्यांनी सिनेमाला ट्रोल करायला सुरुवात केली. हनुमानच्या डायलॉगवरुन सुरु झालेल्या या वादावर लेखक मनोज मुंतशीर यांनी स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली आहे. 

एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मनोज मुंतशीर यांनी हनुमानच्या वादग्रस्त संवादावर प्रतिक्रिया देताना सांगितले ते संवाद आम्ही जाणीवपूर्वक लिहिले आहेत. आजच्या पिढीला कनेक्ट करण्यासाठी तसे संवाद लिहिले गेले आहेत. फक्त हनुमानाबद्दलच का बोलले जात आहे? मला वाटतं जर बोलायचचं असेल तर  भगवान श्रीरामांच्या आणि माता सीतेचे संवादावर देखील बोललं गेलं पाहिजे. 

मनोज मुंतशीर आपल्या या मुलाखतीत पुढे म्हणाले की, ''आम्ही पूर्ण विचार करुन हनुमानाचे संवाद लिहिले आहे. यात कोणतीच चूक नाही. आम्ही ते अगदी साधे सोपे ठेवले आहेत. चित्रपटात अनेक पात्रे असतात, त्यामुळे सर्वांना एकाच भाषेत बोलता येत नाही, त्यामुळे काहीतरी वेगळे करणे आवश्यक आहे.'' 

टॅग्स :आदिपुरूषप्रभास