प्रभास आणि क्रिती सॅनन स्टारर आदिपुरुषच्या एका प्रमोशनल व्हिडिओवरून कवी मनोज मुनताशीर जबरदस्त ट्रोल होत आहे. मुंतशीरने यात रावण कशा प्रकारे अधिर्मी होता यासंदर्भात काही उदाहरणे दिली आहेत. मुंतशीरने रावणाने कशा प्रकारे आपल्या नात्याचाही आदर ठेवला नाही आणि आपल्या सुनेवरही अत्याचार केला, यावर भाष्य केले. याच बरोबर, रावणाच्या कैदेत राहूनही माता सीता सुरक्षित कशा होत्या? हेही सांगिले. या व्हिडिओवर लोकांच्या जबरदस्त रिअॅक्शन्स येत आहेत. अनेकांनी मोनोज मुंतशीर चुकिचा असल्याचे म्हटले आहे, तर अनेकांनी त्याचे समर्थन केले आहे.
अनेक महिलांवर अत्याचार -आदिपुरुषची इंट्रोडक्ट्री क्लिप कृती सेनननेही आपल्या अकाउंटवर शेअर केली आहे. यात मनोज मुंतशीर म्हणतो, कोण होता रावण? तो ज्याने आपला भाऊ कुबेराकडून लंका हिसकावून स्वतःला लंकापती घोषित केले. एवढा अधर्मी की, अनेक महिलांवर अत्याचार केले. वेदवती एक सन्यासी होती. पुंजकस्थला एक अप्सरा, रावणाने दोघींवरही अत्याचार केला. एवढेच नाही, तर त्याने नात्याचीही लाज बाळगली नाही. आपलीच सून असलेल्या रंभावरही त्याने अत्याचार केले आणि माता सीतेला रावण स्पर्षही का करू शकला नाही?
मर्यादा नव्हे मृत्यूचे भय -तो अचानक सदाचारी झाला होता का? तर नाही, त्याला रंभाने श्राप दिला होता की, त्याने कुठल्याही स्त्रीला तिच्या इच्छे विरुद्ध स्पर्ष केला, तर त्याच्या डोक्याचे तुकडे-तुकडे होतील. माता जानकी यांना स्पर्ष न करण्याचे कारण रावणाची मर्यादा नव्हे तर मृत्यूचे भय होते. माता सीता अशोकवाटिकेत यामुळे सुरक्षित राहिल्या, कारण त्यांनी सतीत्वाशी तडजोड केली नाही. आपल्या आत्म्यावर रामाशिवाय कुणाची सावलीही पडू दिली नाही.
लोकांनी केलं ट्रोल -कमेंट सेक्शनमध्ये एका युझरने लिहिले, रावण सर्वात मोठा पंडित होता, अधर्मी नव्हे. मुव्हीसाठीही काहीही बोलू नका. आणखी एकाने लिहिले, रावणासंदर्भात चुकीची माहिती देऊ नका. तो एक महाविद्वान ब्राह्मण होता. त्याने शिव तांडव स्तोत्र रचले. माता जानकीला स्पर्षही केला नाही. माना वाटेल ते बोलू नका. एका युजरने लिहिले रावणाने, आपला सावत्र भाऊ कुबेराच्या सुनेवर अत्याचार केला होता. एका यूजरने मनोजला सपोर्ट करत, रावणाने मृत्यूच्या भीतीने सीतेला हात लावला नव्हता.