Join us  

Adipurush: प्रभास-क्रितीचा चित्रपट 'आदिपुरुष'च्या तिकीट खरेदीसाठी लोकांची झुंबड, 'KGF 2 'चाही रेकॉर्ड मोडला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 1:09 PM

अवघ्या 2 दिवसांत चित्रपटाची 45 हजार तिकिटं विकली गेली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ओम राऊत (Om Raut) यांच्या 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमाची चर्चा आहे. रामायणावर हा सिनेमा आधारित आहे.  6500 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणाऱ्या या मेगा चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती.  चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता त्याच्या ॲडव्हान्स बुकिंगवरूनच दिसून येते. अवघ्या 2 दिवसांत चित्रपटाची 45 हजार तिकिटं विकली गेली आहेत. हे पाहून या चित्रपटाला लोकांचं भरभरून प्रतिसाद मिळणार असल्याचं दिसत आहे.

आदिपुरुषाचे ॲडव्हान्स बुकिंग रविवारपासून सुरू झाले. बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, PVR वरून 21,500 तिकिटं विकली गेली आहेत. त्याचवेळी, आयनॉक्समध्ये या चित्रपटाची 14,500 तिकिटं विकली गेली आहेत आणि सिनेपोलिसमध्ये 9,000 तिकिटं विकली गेली आहेत.  या चित्रपटाची एकूण ४५ हजार तिकिटं विकली गेली आहेत. रिपोर्टनुसार  3.50 ते 4 लाख तिकिटांची विक्री होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर चित्रपटाची चर्चा भारतात आधीपासून चर्चा आहे. यासोबतच परदेशातही या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे. ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत या चित्रपटाने KGF 2 ला मागे टाकले आहे.

दरम्यान  प्रभास (Prabhas) प्रभू श्रीरामाच्या तर क्रिती सेनन (Kriti Sanon) सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. तर सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर सैफ अली खान लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'आदिपुरुष'  या चित्रपटात मराठमोळा  देवदत्त नागे (Devdatta Nage) हा हनुमानाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना 3D मध्ये पाहता येणार आहे. . हा चित्रपट येत्या १६ जून रोजी रिलीज होणार आहे.   चित्रपट  हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही रिलीज होणार आहे.

टॅग्स :आदिपुरूषप्रभासक्रिती सनॉन