Aditi Rao Hydari : अभिनेत्री आदिती राव हैदरी हिचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत, तिला वेगळ्या ओळखीची गरज नाही. आदिती राव हैदरी केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही खूप प्रसिद्ध आहे. आदिती खऱ्या आयुष्यात राजकुमारी आहे. आता ही राजकुमारी लवकरच तिच्या राजकुमारासोबत बंधनात अडकणार आहे. गेल्या मार्च महिन्यात आदितीने बॉयफ्रेंड सिद्धार्थसोबत साखरपुडा केला. आता दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. त्यांचं लग्न हे एका खास ठिकाणी होणार आहे.
आदिती राव हैदरी हिने नुकतेच वोग इंडियाशी बोलताना लग्न कुठे करणार याचा खुलासा केला. आपल्या परंपरा आणि संस्कृतींचं जतन करण्यासाठी आदिती-सिद्धार्थ दोघांनीही पारंपरिक थाटात लग्न करण्याचा निर्णय घेतला. आदिती आणि सिद्धार्थ हे तेलंगणातील 400 वर्ष जुन्या मंदिरात लग्न करणार आहेत. आदिती म्हणाली, "माझा लग्न सोहळा 400 वर्षे जुन्या वानापर्थी येथील मंदिरात होणार आहे. जे माझ्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचं आहे". मात्र, अभिनेत्रीच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.
आदितीचा जन्म 28 ऑक्टोबर 1986 रोजी हैदराबादमध्ये एहसान हैदरी आणि विद्या राव यांच्या घरी झाला. आदिती ही हैदराबादची निजाम होती. साहेल अकबर हैदरी यांची नात आहे. अदितीचे आजोबा राजा जे. रामेश्वर राव हे तेलंगणातील वानापर्थीचे राजा होते. त्यामुळे आदितीच्या कुटुंबासाठी वानापर्थी येथील मंदिर खूप महत्त्वाचे आहे.
आदितीची सिद्धार्थसोबत पहिली भेट ही २०२१ मध्ये तेलगू सिनेमा 'समुद्रम'च्या सेटवर झाली होती. यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन दोघेही एकमेकांना डेट करु लागले. सुरुवातीला या दोघांनीही त्याचं नातं गुप्त ठेवलं असलं तरीही नंतर मात्र त्यांनी अधिकृतपणे नात्याचा जाहीर खुलासा केला. आदितीचं हे दुसरं लग्न असून तिने याआधी सत्यदीप मिश्रासोबत लग्न केलं होतं. त्यानंतर 4 वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. आता चाहत्यांना आदिती आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या आतुरता आहे.