बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत जे राजघराण्यातील आहेत. त्यातील एक अभिनेत्री अदिती राव हैदरी आहे. अदितीचा जन्म 28 ऑक्टोबर 1986 साली हैदराबादमधील एका शाही कुटुंबात झाला. अदिती आज आपला 34वा वाढदिवस साजरा करते आहे.
आदितीच्या वाढदिवसा निमित्ताने आज आम्ही तुम्हाला तिच्या काही खास गोष्टी सांगणार आहोत. अदिती राजा-महाराजाच्या कुटुंबीातून येते. अदितीचे आजोबा अकबर हैदरी हे 1869 ते 1941 पर्यंत हैदराबादचे पंतप्रधान होते. तसेच अदिती ही मोहम्मद सालेह अकबर हैदरा यांची भाची आहे. जे आसामचे माजी राज्यपाल राहिले आहेत. अदितीचे आजोबा राजा जे. रामेश्वरा राव यांनी तेलंगणात वनपार्थीवर राज्य केले आणि शांता रामेश्वर राव हे हैदराबादच्या सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञासमवेत ओरिएंट ब्लॅक्सन पब्लिशिंग हाऊसचे अध्यक्ष होते.
आदितीने आपले शालेय शिक्षण आंध्रप्रदेशमध्ये पूर्ण केले तर महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून. वयाच्या सहाव्या वर्षांपासून तिने भरतनाट्यमयचे धडे गिरवायला सुरुवात केली. प्रसिद्ध नृत्यागंणा लीला सैमसन यांची ती शिष्य आहे.अदितीची आई एक ठुमरी गायिका आहे.
अदितीने आपल्या करिअरची सुरुवात तमिळ 2007 साली आलेल्या श्रृंगारम चित्रपटातून केली. या चित्रपटाला तीन नॅशनल अॅवॉर्डदेखील मिळाले. अदितीला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला तो राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी दिल्ली 6 या चित्रपटातून. मात्र अदितीली बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली ती 'ये साली जिंदगी' आणि 'रॉकस्टर' चित्रपटातून. ये साली जिंगदी चित्रपटात अदितीने आपल्या को-स्टारला तब्बल 22 वेळा किस केले होते. या कारणामुळे हा चित्रपट चर्चेत आला होता.